हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

ग्रामीण खेळाडूंना राज्य-देश पातळीवर संधी मिळालीच पाहिजे! – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

On: January 28, 2026 2:03 PM
Follow Us:
साखरखेर्डा येथे खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा | २८ जानेवारी २०२६

ग्रामीण खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात राज्य व देश पातळीवर संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे क्रिडांगण. साखरखेर्डा येथे अद्ययावत क्रिडांगण उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित पाठपुरावा करावा. मी निश्चितपणे येथे क्रिडांगण उपलब्ध करून देईन, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

ते साखरखेर्डा येथे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित खासदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये क्रीडा क्षेत्राबाबत प्रचंड आवड असून, अशा स्पर्धांमुळे त्यांच्या खेळाडू वृत्तीला चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, बजरंग दलाचे अमोल अंधारे, शिवसेना नेते योगेश जाधव, अतीष तायडे, गंभिरराव खरात, जीवनसिंग राजपूत, बादलसिंग राजपूत, माजी सरपंच महेंद्र पाटील, रामदाससिंग राजपूत, मधुकर साखरे, विलास गवई, सुधाकर गवई, बबनराव जायभाये, दामुअण्णा शिंगणे, अरुण देशमुख, दर्शन गवई यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

खेळ हा सर्व समाजाला एकत्र आणणारा घटक आहे. राजकारणही अशाच एकोप्याने आणि सर्वसमावेशक पद्धतीने झाले पाहिजे. केवळ ‘माझा समाज’ या विचारावर राजकारण चालत नाही, असे मत बजरंग दलाचे अमोल अंधारे यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. संजय रायमुलकरविलास गवई यांनीही मार्गदर्शनपर भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण देशमुख यांनी केले, तर संचालन ओम सोनुने यांनी केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

ही खासदार चषक क्रिकेट स्पर्धा योगेश जाधव व मित्रमंडळ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली असून, प्रथम बक्षीस १ लाख रुपये, द्वितीय ५१ हजार, तृतीय ३१ हजार व चतुर्थ २१ हजार रुपये अशी एकूण २ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.


📌 संबंधित बातम्या

👉 अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि ग्रामीण भागाशी जोडलेल्या बातम्यांसाठी Kattanews.in वाचत राहा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment