हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

स्वार्थाची परिसीमा! जिवंत आईला मृत दाखवून मुलाने १० लाख हडपले; जळगाव जामोद हादरले.

On: December 17, 2025 10:02 AM
Follow Us:
जळगाव जामोद जिवंत आईला मृत दाखवून १० लाख रुपयांची फसवणूक प्रकरण
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

प्रतिभा जगदने/

जळगाव जामोद फसवणूक प्रकरण पुन्हा एकदा नात्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे. जिवंत आईला मृत दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, आरोपी मुलाने बनावट मृत्युदाखल्याच्या आधारे १० लाख रुपयांची फसवणूक केल्याने जळगाव जामोद परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.स्वार्थासाठी स्वतःच्या जिवंत आईला मृत घोषित करून बनावट स्वयंघोषणापत्र तयार करत नगरपरिषद कार्यालयाची फसवणूक केल्याचा हा प्रकार उघडकीस आला. आरोपीने नगरपरिषदेत खोटे कागदपत्र सादर करून आईचे मृत्युदाखले मिळवले.या बनावट मृत्युदाखल्याच्या आधारे आरोपीने बँकेत आईच्या नावावर असलेली सुमारे १० लाख रुपयांची मुदत ठेव (FD) मोडून संपूर्ण रक्कम काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार समजताच संबंधित महिलेच्या पायाखालची वाळू सरकली.

या प्रकरणी सुनील देवीदास निकाळजे (वय ३५, विद्युत अभियंता, नगरपरिषद जळगाव जामोद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रेमसिंग कमलसिंग राजपूत (रा. राजपूतपुरा, जळगाव जामोद) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, संबंधित महिला कौशल्याबाई राजपूत यांनीही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याआधी अनेकदा नगरपरिषदेत पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या तक्रारीनंतर जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नितीनकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण सरकटे करत आहेत.

👉 अशीच धक्कादायक आणि विश्वासार्ह बातमी सर्वप्रथम वाचण्यासाठी

Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि बातमी शेअर करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment