हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
लोणी यात्रेआधीच रस्ता खोदकामाचा धक्कादायक पसोयाबीन कापूस दरवाढीसाठी ‘क्रांतिकारी’ मोठरिसोड नगरपरिषद निवडणुका: शहरातील Security Check नाकाबशेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १५ दिवसांत ११ हजार Ladki Bahin Yojana : उद्यापासून खात्यात 1500 रुपये… पण एक अट सिंदखेडराजा निवडणूक तापली! चुरशीच्या लढतीत क

Fake Construction Worker Registration: खामगावात बनावट बांधकाम मजुरांच्या प्रमाणपत्राचा गोरखधंदा उघड! दोन ऑनलाईन सेंटरवर पोलिसांची धडक तपासणी.

On: October 29, 2025 4:22 PM
Follow Us:

रामदास कहाळे / बुलढाणा

खामगाव शहरात बांधकाम मजुरांची नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली मोठा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कामगार विभागाने दोन ऑनलाईन सेंटरवर छापा टाकून बनावट बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचा भंडाफोड केला आहे.

या कारवाईत दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात एकच खळबळ माजली आहे.

बनावट बांधकाम मजूर प्रमाणपत्रांचा वापर उघडकीस

कामगार विभागाला काही नागरिकांकडून बनावट बांधकाम मजूर प्रमाणपत्रांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान असे उघड झाले की काही ऑनलाईन सेंटर नागरिकांकडून पैसे घेऊन खोटी प्रमाणपत्रे देत होते. या प्रमाणपत्रांद्वारे अनेकजण शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत लाभ मिळवत होते.

हेही वाचा.

Gold Price Today : एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ₹4000 ची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या!

कामगार विभागाची छापा मोहीम

२७ ऑक्टोबर रोजी कामगार निरीक्षक राजेश केशवराव वनारे यांनी पोलिस बंदोबस्तात शहरातील दोन ऑनलाईन सेंटरवर धडक कारवाई केली.त्यात आरटीओ सर्व्हिस दुकान क्र.४ (काशिफ न.प. कॉम्प्लेक्स) आणि विहान कम्प्युटर अँड झेरॉक्स सेंटर (मराठा पाटील सभागृहाजवळ)

येथून संशयास्पद कागदपत्रे, बनावट शिक्के आणि सही नसलेली प्रमाणपत्रे सापडली.या प्रमाणपत्रांवर “आर. के. इन्फ्रा पार्टनर” आणि “शुभम सी. वाघ सिव्हिल इंजिनियर” असे शिक्के आढळले. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

या प्रकरणात कासिफ बेग कलिम बेग (वय २९, तायडे कॉलनी) आणि अजय रामदास गवई (वय ३३, शंकर नगर) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सहाय्यक पोनि विकास पाटील हे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

कामगार विभागाने नागरिकांना इशारा दिला आहे की, बांधकाम मजूर नोंदणीसाठी केवळ अधिकृत सरकारी वेबसाइटचा वापर करावा.खाजगी ऑनलाईन सेंटरकडून बनावट प्रमाणपत्रे घेणे म्हणजे स्वतःला फसवणुकीच्या जाळ्यात ओढून घेणे ठरू शकते. विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!