हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सामाजिक जाणीव ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. शशिकांत खेडेकर – पत्रकार दिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा

On: January 11, 2026 11:54 AM
Follow Us:
पत्रकार दिनानिमित्त देऊळगावराजा येथे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

देऊळगावराजा (बुलढाणा) | शुक्रवार, ९ जानेवारी २०२6

सामाजिक जाणीव ठेवून सातत्याने कार्य करणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करून पुन्हा एकदा आपली संवेदनशील भूमिका अधोरेखित केली. (Dr Shashikant Khedekar journalist honor Sindkhed Raja) हा कार्यक्रम पत्रकार आणि समाज यांच्यातील दुवा अधिक बळकट करणारा ठरला.

राजकीय वारसा जोपासत सामाजिक जीवनात लोकांच्या अडचणी समजून घेणारे नेतृत्व म्हणजे डॉ. शशिकांत खेडेकर. देऊळगावराजा व सिंदखेडराजा येथील पत्रकार भवनाचा प्रश्न त्यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. मतदारसंघात आजही अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी खेडेकर साहेब निश्चितच प्रयत्न करतील, अशी अपेक्षा जेष्ठ पत्रकार दिलीप नाईकवाड यांनी व्यक्त केली.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज ९ जानेवारी रोजी देऊळगावराजा येथील पत्रकार भवनात पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार दिलीप नाईकवाड, गजानन तिडके, सुषमा राऊत, युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर उपस्थित होते.
पत्रकार हा समाजाच्या समस्या मांडणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे प्रतिपादन करताना डॉ. शशिकांत खेडेकर म्हणाले की, समाजातील अडीअडचणींना वाचा फोडून त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. माझ्या राजकीय जीवनात पत्रकारांचे मोलाचे सहकार्य लाभले असून पद असो वा नसो लोकांशी संवाद कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.
शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मतदारसंघातील विकासकामे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार भवनासाठी सर्व पत्रकारांचे सहकार्य लाभले, तसेच मतदारसंघातील कामांसाठीही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, देऊळगाव महीसह ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक इंगळे, गजानन तिडके, भगवान साळवे, सुषमा राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
हे पण वाचा..

चिखली-खामगाव रोडवर कार उलटली, १७ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपक नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर मान्टे यांनी केले. कार्यक्रमाला डी.एन. पांचाळ, मुकूंद पाठक, भगवान नागरे, रामदास कहाळे, गजानन काळूसे, सचिन खंडारे, समाधान सरकटे, बाजीराव वाघ, सुनील मतकर, मुसरीफ कोटकर, संतोष गाडेकर, दिलीप खंडारे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.


👉 अशीच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

डॉ. अनिल बनसोड युवांना संविधानिक मूल्यांचे महत्त्व सांगत आहेत

युवकांनी संविधानिक मूल्यांचे जतन करावे – डॉ. अनिल बनसोड

मलकापूर पांग्रा येथे ५० मोटारपंपांद्वारे काळ्यापाण्याच्या सिंचन तलावातून अवैध पाणी उपसा

५० मोटारपंपांनी ‘काळ्यापाण्याचा तलाव’ सिंचन तलाव रिकामा! मलकापूर पांग्रात गुराढोरांच्या पाण्याचा भीषण प्रश्न उभा

नामांतर लढ्याच्या संघर्षभूमीवर शौर्यस्तंभ उभारणीबाबत जयदीप कवाडे भाषण करताना

नामांतर लढ्याच्या शौर्यस्तंभाचे काम ६ महिन्यांत पूर्ण होणार – जयदीप कवाडे

वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये अवैध सावकारीवर सहकार व पोलिस विभागाची धडक कारवाई

वाशिम जिल्ह्यात अवैध सावकारीवर दणका! रिसोडमध्ये दोन ठिकाणी धडक छापे

गोगरी वाशिम येथे मस्टरच्या पैशांसाठी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची मारहाण करतानाचा व्हायरल व्हिडीओ

वाशिम जिल्ह्यात मोठा संतापजनक प्रकार! मस्टरच्या पैशांसाठी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची मारहाण; व्हिडीओ व्हायरल

पांगरी काटे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करताना विद्यार्थी

पांगरी काटे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष

Leave a Comment