देऊळगाव राजा| राहुल नायर
अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथे अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महसूल विभागाने दोन्ही ट्रॅक्टर तात्काळ जप्त केले.
ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी शिपाई अर्जुन सोनसळे यांनी सहकार्य केले.
जप्त करण्यात आलेले दोन्ही ट्रॅक्टर पुढील दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे जमा करण्यात आले आहेत.
अवैध रेती उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंडपगाव परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
👉 Join WhatsApp Group
📢 KattaNews अपडेट मिळवा
महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक बातम्या, शेतकरी योजना, सरकारी निर्णय आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी KattaNews.in ला भेट देत रहा.










