हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धान्याच्या पोत्यांची थप्पी अचानक कोसळली; दोन हमाल दबले, एकाचा पाय मोडला! साखरखेर्डा गोदामातील दुर्घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

On: August 11, 2026 8:16 AM
Follow Us:
साखरखेर्डा शासकीय धान्य गोदामात मक्याच्या पोत्यांची थप्पी कोसळल्याची घटना

साखरखेर्डा |समाधान सरकटे 

साखरखेर्डा येथील शासकीय धान्य गोदामात मक्याच्या पोत्यांची थप्पी अचानक कोसळल्याने दोन हमाल पोत्यांखाली दबले. सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही बाहेर काढले. या दुर्घटनेत भानुदास कुरंगळ यांच्या पायाचे हाड मोडले असून त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ९ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या हमालांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गोदामातून मक्याची पोती वाहनात भरण्याचे काम सुरू असताना पोत्यांची थप्पी अचानक कोसळली. त्यावेळी भानुदास कुरंगळ आणि शंकर वाघ हे दोन हमाल पोत्यांखाली दबले. घटनेनंतर उपस्थित सहकाऱ्यांनी तत्काळ मदत करीत दोघांनाही पोत्यांच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या दुर्घटनेत भानुदास कुरंगळ यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यात हमालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. भारतीय अन्न महामंडळा च्या गोदामातून आलेले धान्य वाहनांमधून उतरविणे, गोदामात पोत्यांच्या थप्प्या लावणे तसेच स्वस्त धान्य दुकानांकडे पाठविण्यासाठी पुन्हा पोती वाहनांमध्ये चढविणे, अशी अत्यंत कष्टाची आणि जोखमीची कामे हमाल करतात.

मात्र, या कामादरम्यान हमालांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने, पोत्यांच्या थप्प्या सुरक्षित पद्धतीने रचण्याची व्यवस्था, कामगारांना आवश्यक प्रशिक्षण आणि आपत्कालीन मदत व्यवस्था पुरेशी आहे का, असा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या हमालांना सुरक्षा विमा आणि महागाई निर्देशांकानुसार लाभ दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. प्रत्यक्षात हे लाभ सर्व हमालांपर्यंत पोहोचतात का, अपघातग्रस्त कामगाराच्या उपचारांचा खर्च कोण उचलणार आणि संबंधित कामगाराला नियमानुसार नुकसानभरपाई मिळणार का, याबाबत पुरवठा विभागाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.

साखरखेर्डा येथील या दुर्घटनेची चौकशी करून गोदामातील पोत्यांच्या थप्प्या रचण्याची पद्धत, गोदामाची सुरक्षितता आणि कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
स्थानिक घडामोडी, अपघात, शासकीय योजना आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.👉 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment