हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देऊळगाव राजा जवळ भीषण अपघात; कार पुलावर आदळत चुराडा! एक जागीच ठार, तिघे गंभीर

On: November 6, 2025 7:41 AM
Follow Us:

रामदास कहाळे/सिंदखेडराजा

देऊळगाव राजा (बुलढाणा): सिंदखेड राजाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जांभोऱ्यानजीकच्या पुलावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत व्यक्तीची ओळख अर्जुनसिंग सुनीलसिंग ठाकूर (वय २५, रा. खामगाव) अशी झाली आहे. अपघातग्रस्त कार क्रमांक एमएच १५ केके ०३४२ ही खामगावहून नाशिकच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार पुलाच्या कठड्यावर आदळली.

धडकेचा जोर एवढा होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात विजय ठाकूर, धीरज राठी आणि खंडागळे हे तिघे गंभीर जखमी झाले असून ते सर्व खामगाव येथीलच असल्याचे समजते.

योगायोगाने घटनास्थळाजवळून जात असताना पोलिस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांच्या निदर्शनास ही दुर्घटना आली. त्यांनी तत्काळ देऊळगाव राजा पोलिसांना माहिती दिली. काही क्षणांतच पोलिस उपनिरीक्षक कांचन जारवाल, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण आणि चालक संतोष मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बचावकार्य सुरू केले.

हे पण वाचा.

देऊळगाव राजा : डीपी रोडवरील अतिक्रमणावरून वाद तापला; भाजपा शहराध्यक्षांची तक्रार

जखमींना प्रथम देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर अर्जुनसिंग ठाकूर यांना मृत घोषित करण्यात आले. तर तिघा गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघाताच्या कारणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

👉महाराष्ट्रातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडी आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या kattanews.in न्यूज वेबसाईटला भेट द्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

Leave a Comment