हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखला काकड गावात तणाव! शिवसेना महिला आघाडी नेत्या शिवानी वाघ यांना मारहाण; आत्महत्येच्या स्टेटसनं खळबळ

Follow Us:
चिखला काकड गावात तणावानंतर पोलिस बंदोबस्त आणि जमाव
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

 

लोणार तालुका (बुलढाणा) | २१ फेब्रुवारी २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात महिला नेत्या मारहाण प्रकरणामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख शिवानी (संजीवनी) वाघ यांना गावातील काही व्यक्तींनी मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर त्यांनी ठेवलेल्या आत्महत्येच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

घटनेनुसार, शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला. सरपंच व त्यांच्या समर्थकांकडून पुतळा हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. याला विरोध केल्यानंतर आपल्यावर हल्ला करण्यात आला, अशी माहिती शिवानी वाघ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मारहाणीदरम्यान महिलांनाही जमावात सामील करण्यात आले असून पोलिसांच्या उपस्थितीतच कपडे फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वातावरण अधिक तापले आहे.

दरम्यान, “सगळं संपलं… उद्या सकाळी ७ वाजता आत्महत्या करणार” असा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून गावात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देत शांततेचे आवाहन केले. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, गावात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले असून काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अॅड. निशिकांत राजे जाधव उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडनेही या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

 


👉 Related News


📲 तुमच्या परिसरातील बातम्या वाचण्यासाठी भेट द्या:
www.Kattanews.in

 

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दोन गटात झालेला वाद

शिवजयंती मिरवणुकीत गुंज येथे राजकीय राडा; चौघे जखमी, १९ आरोपींवर गुन्हे दाखल

Cyber Police Station Buldhana NCCRP complaint notice Maharashtra

सायबर पोलिसांची मोठी कारवाई! लोणार तालुक्यातील तरुणावर NCCRP तक्रार; सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ

पांग्रीकाटे येथे पोलिसांनी जप्त केलेली अफू शेती

पांग्रीकाटे येथे शेतात अफू शेतीचा भांडाफोड! दीड कोटींचा माल जप्त; दोन आरोपी अटकेत

बुलढाणा एलसीबीने 21 आणि 17 घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक

राजेशने केल्या २१ घरफोड्या, राजेंद्रच्या नावावर १७ गुन्हे! LCBच्या जाळ्यात तीन अट्टल चोरटे; ६.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

khaparkheda-illegal-sand-mining-lonar-buldhana-maharashtra

खापरखेड रेती घाटावर नियमांना तिलांजली! पोकलॅंडच्या साह्याने अवैध उत्खनन; महसूल विभागाच्या भूमिकेवर संशय

मेहकरात गस्तीदरम्यान पोलिसावर हल्ला BNS गुन्हा

मेहकरात गस्तीदरम्यान पोलिसावर हल्ला! गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की; तिघांवर BNS अंतर्गत गुन्हा

Leave a Comment