हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
चिखली पोलिसांची मोठी कारवाई! डिझेल चोरी करणादेऊळगाव राजात तलवारीने केक कापून वाढदिवस साजबाप म्हणावं की हैवान! रागाच्या भरात दोन जुळ्यवकिल असीम सरोदे यांना मोठा झटका! बार कौन्सिलनसामान्य शेतकरी ते जनतेचा आवाज! नागेशभाऊ गंगाBuldhana: किनगाव राजा प्रकरणात नवा ट्विस्ट! युवकान

बुलढाणा जिल्हा हादरला! अंढेर्यात चौथा खून — युवकाची निघृण हत्या, गावात तणावाचं वातावरण.

On: October 26, 2025 6:39 AM
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावात युवकाची निघृण हत्या करण्यात आली. दिवसभरातच हा जिल्ह्यातील चौथा खून ठरला असून संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे.

मृत युवकाचं नाव आकाश उत्तम चव्हाण (वय २५, रा. आसोला बु.) असं असून, त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने उघड्यावर हल्ला करण्यात आला. घटनेनंतर गावात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अंढेरा पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच हत्या.

सर्वाधिक धक्कादायक म्हणजे हा खून अंढेरा पोलीस स्टेशनपासून काहीच अंतरावर झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अयान सय्यद नासीर (वय १८ ते २०) या तरुणाचं नाव संशयित म्हणून पुढे आलं आहे.स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडून तातडीने आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Devendra Fadnavis on Farmers: हमीभावापेक्षा कमी भावात कुणीही माल विकू नये – शेतकऱ्यांनो, नोंदणी करून सुरक्षित विक्री करा.

अधिकारी घटनास्थळी दाखल — तपासाला वेग

घटनेची माहिती मिळताच मेहकरचे उपविभागीय अधिकारी खर्डे आणि अंढेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे.सलग चार खुनांनी बुलढाणा जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!