भोकरदन प्रतिनिधी : संजीव पाटील
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदनमध्ये स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांच्या नामकरणानुसार ‘वंदे मातरम’ गीतगायन शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात नायब तहसीलदार अविनाश पाटिल अध्यक्षस्थानी होते, तर अधिवक्ता हितेश मेहता यांनी देशभक्तीचा संदेश देत उपस्थितांना संबोधित केले.
प्रमुख शाळा ज्या कार्यक्रमात सहभागी झाल्या त्यात अक्षरज्योती इंग्लिश स्कूल, श्री गणपती इंग्लिश स्कूल, पायोनियर इंग्लिश स्कूल, गुरुकुल इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल भोकरदन, शिवा प्राथमिक विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इत्यादींचा समावेश होता.
हे पण वाचा.
भोकरदन बसस्थानकावर सुरक्षारक्षकाने वृद्धास केली बेदम मारहाण; 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू.
संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बारोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एस. खरात यांनी केले.
या शताब्दी महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढवली आणि परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सशक्त संदेश दिला.
👉अधिक माहिती आणि अद्यतने मिळवण्यासाठी Kattanews.in ला भेट द्या.










