भोकरदन तालुका प्रतिनिधी – संजीव पाटील
सतत पडणाऱ्या पावसाने कापसाचे बोंडे सडली, मका पिक नाशाच्या मार्गावर आले आहे आणि सोयाबीन पिकही पूर्णपणे कुजले आहे. या स्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. “पुन्हा आलेल्या पावसाने उरले सुरले नेले” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत एक रुपयाही खात्यात जमा झालेला नाही. शासनाने जाहीर केलेली मदत, तसेच रब्बी पिकांच्या पेरणीसाठीचे अनुदान मिळालेले नाही. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना अनुदान व पिक विमा रक्कम देण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
हे पण वाचा.
आता मुलींना मिळणार ₹1 लाख 1 हजार रुपये; ‘लेक लाडकी योजना’ अर्ज सुरू – लगेच अर्ज करा!
अनेक व्यापाऱ्यांकडून सोयाबीन आणि मका हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केली जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळी सणानिमित्त शेतकऱ्यांना मातीमोल दराने पिक विकावे लागत आहे. शासनाने तातडीने मका व सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले असून काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. आता शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे लागले आहे.










