हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

स्व.ॲड.आप्पासाहेब सरनाईक स्मृतिदिनानिमित्त क्रीडा सप्ताहाला उत्साहात सुरुवात

Follow Us:
स्व. ॲड. आप्पासाहेब सरनाईक स्मृतिदिनानिमित्त रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालय मोपमध्ये आयोजित क्रीडा सप्ताह
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

📍 रिसोड | 🗓️ ६ जानेवारी २०२६ 

स्व.ॲड.आप्पासाहेब सरनाईक स्मृतिदिन निमित्ताने रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोप येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा सप्ताहात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन अमरावती विभागीय शिक्षक संघाचे मा. आमदार
ॲड. किरणराव सरनाईक, शिक्षण समिती अध्यक्ष श्री गोपीकिसन सिकची, संचालक श्री जनार्दनजी नरवाडे,डाॅ. श्री रामेश्वरजी नरवाडे
श्री जुगलकिशोर शर्मा यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य
मा. श्री शरदकुमार टेमधरे यांच्या हस्ते
स्व. ॲड. आप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी पर्यवेक्षक श्री सुनील लांडगे,
प्रा. जीवन हेंबाडे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा सप्ताहामध्ये विविध मैदानी व बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
क्रीडा सप्ताहाची सांगता आनंद मेळाव्याने करण्यात आली.

संपूर्ण क्रीडा सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन
क्रीडा शिक्षक श्री विठ्ठल नायक
प्रा. समाधान गायकवाड यांनी केले.

दरम्यान, ११ जानेवारी २०२६ (रविवार) रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था, वाशीमचे संस्थापक
शिक्षण महर्षी स्व. ॲड. आप्पासाहेब सरनाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून
विनम्र अभिवादन करण्यात आले.


📢 वाचकांसाठी आवाहन

अशाच शैक्षणिक, सामाजिक व ग्रामीण भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी
KattaNews.in ला दररोज भेट द्या.

🔗 हे पण वाचा..

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment