हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अंजनी खुर्दमध्ये ईद मिलादचा उत्साह; मदरशातील मुलांचा जुलूस अन् नात-कलिमाचे पठण

On: August 27, 2026 8:59 PM
Follow Us:
अंजनी खुर्द येथे ईद मिलाद निमित्त मदरशातील मुलांचा जुलूस

अंजनी खुर्द  : शेख बाबा शेख नुर

लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे ईद मिलाद उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ईद मिलाद निमित्त मुस्लिम समाज बांधवांकडून विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मदरशातील मुलांचा जुलूस, नात, कलिमा आणि हदीस पठणासह विविध कार्यक्रम पार पडले.

बुधवारी (दि. 26 ऑगस्ट) सकाळी 9 वाजता बंगला चौक येथून जुलूसला सुरुवात झाली. मदरशातील मुलांनी गावातून जुलूस काढत सहभाग नोंदवला. जुलूसदरम्यान गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या वेळी K.G.N ग्रुपच्या वतीने मदरशातील मुलांना विविध फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. गावचे सरपंच अमोल अवसरमोल यांनी सर्व मुलांना गुलाब देऊन त्यांचे स्वागत केले.

यानंतर जामा मस्जिद मदरशातील मुलांचा जलसा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मुलांनी नात, कलिमा आणि हदीसचे पठण केले. उपस्थितांनी मुलांचा उत्साह वाढवला.

कार्यक्रमाच्या शेवटी इमाम हाफिज मुशरफ यांनी दुआ केली. दुआनंतर ईद मिलाद कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी K.G.N. ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी राजू अली, सत्तार भाई, अफसर भाई, हैदर भाई, हबीब भाई, रशीद भाई यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

📲 Katta News WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुपला जॉईन करा.

👉 Join WhatsApp Group

📰 संबंधित बातम्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान करताना रक्तदाते

साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १४० जणांचे रक्तदान, हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी

रस्ता नसल्याने सर्पदंश झालेल्या गर्भवतीला झोळीतून नेताना ग्रामस्थ

रस्ता नसलेल्या गावाची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी; सर्पदंश झालेल्या गर्भवतीचा चार किलोमीटर झोळीतून अखेरचा प्रवास

धाड आणि धामणगाव बढे तालुकानिर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदन

बुलढाण्यासाठी मोठी मागणी! धाड-धामणगाव बढे तालुकानिर्मितीसाठी ‘देवाभाऊं’कडे निवेदन; मुख्यमंत्री फडणवीसांचे सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

हिवरा खुर्द येथे विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप

‘दहा वेळा शून्य हा मोबाइल नंबर होऊ शकतो का?’ प्रश्न विचारला अन् शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप; जानेफळ पोलिसांत तक्रार

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजात पडक्या घरात अर्भकाचा मृतदेह

देऊळगाव राजात काळीज पिळवटून टाकणारी घटना! पडक्या घरात अर्भकाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

धाड चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीला अटक

चाकू हल्ल्याने धाड हादरले! दोन जणांवर वार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक; न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Comment