हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकर-साखरखेर्डा रस्त्यावर रोहीचा थरार! दुचाकीला धडक; फार्मसी कॉलेजचे २ विद्यार्थी गंभीर

On: January 9, 2026 10:57 AM
Follow Us:
मेहकर साखरखेर्डा रस्त्यावर रोही आल्याने दुचाकी अपघाताचे दृश्य

साखरखेर्डा /समाधान सरकटे 

मेहकर-साखरखेर्डा रस्त्यावर रोही (निलगाय) आल्याने अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मेहकर साखरखेर्डा रोही अपघातात फार्मसी कॉलेजचे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, वाढत्या वन्यप्राणी उपद्रवामुळे मेहकर रोडवर अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता गणपूर (ता. मेहकर) येथील अनिकेत चव्हाण (२२) आणि दीपक साळवे (२१) हे साखरखेर्डा येथील कै. भास्करराव शिंगणे कला, आशालता गावंडे वाणिज्य व नारायणराव गावंडे विज्ञान व फार्मसी कॉलेज येथे दुचाकीने जात होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

दरम्यान, साखरखेर्डा–मेहकर मार्गावर सुखदेव जैवळ यांच्या शेताजवळ अचानक रोही (निलगाय) रस्ता ओलांडण्यासाठी धावून आली. क्षणातच दुचाकीची निलगायीशी जोरदार धडक बसली.

धडक इतकी भीषण होती की दोन्ही विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले, तर निलगाय जागीच ठार झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मेहकर-साखरखेर्डा रस्त्यावर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने अशा अपघातांची मालिका सुरू असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


🚨 नागरिकांची मागणी

  • मेहकर-साखरखेर्डा रस्त्यावर वन्यप्राणी चेतावणी फलक बसवावेत
  • अपघातप्रवण ठिकाणी गतीमर्यादा लागू करावी
  • रात्रीच्या वेळेस पोलीस व वनविभागाची गस्त वाढवावी

📌 हे पण वाचा..


👉 तुमच्या परिसरातील बातमी Kattanews.in ला पाठवा

📲 WhatsApp 9561475736 | 📞 Contact | 🌐 Trusted Local News Portal

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

शिवनी आरमाळ ग्रामपंचायतीतील निधी व्यवहारावर चौकशीची मागणी

धक्कादायक! पदभार सोडलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीवर ग्रामपंचायतीतून निधीची उचल?; गटविकास अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्न

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

Leave a Comment