समाधान सरकटे/प्रतिनिधी
योजनेसाठीचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे.
मागासवर्गीय शेतकऱ्यांनी 5 HP विद्युत मोटार पंप योजनेसाठी, तर मागासवर्गीय महिलांनी शिलाई मशीन योजनेसाठी आपले अर्ज संबंधित पंचायत समिती कार्यालयातील गट विकास अधिकारी यांच्याकडे 15 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावेत.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन व जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रमोद यंडोले यांनी अधिक माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
👉 असा करा अर्ज
- जवळच्या पंचायत समिती कार्यालयातून अर्ज घ्या
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा
- 15 जानेवारी 2026 पूर्वी अर्ज सादर करा
📌 महत्वाची सूचना: अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.















