हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भाजपात अंतर्गत स्फोट! निष्ठावान देशपांडेंचाच गेम; उपाध्यक्ष पदावरून काढले

On: January 2, 2026 2:00 PM
Follow Us:
भाजपात अंतर्गत स्फोट: बुलढाणा भाजप जिल्हा उपाध्यक्ष उदय देशपांडे यांना पदावरून काढल्याने पक्षात खळबळ
विशाल गवई /बुलढाणा 

बुलढाणा: भाजपात अंतर्गत स्फोट पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे.भाजपात अंतर्गत स्फोट झाल्याचे चित्र बुलढाणा शहरात पाहायला मिळत असून, जिल्हा उपाध्यक्ष
उदय देशपांडे यांना पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पदावरून काढण्यात आले आहे.
भाजपात अंतर्गत स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे.

नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार केल्याच्या तक्रारीनंतर
जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील यांनी हे बडतर्फीचे पत्र जारी केले. तसेच, आठ दिवसांत उत्तर न दिल्यास
पक्षातूनही हकालपट्टीचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईवर प्रतिक्रिया देताना उदय देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“ते काय काढणार? मी १७ डिसेंबर रोजीच विदर्भ प्रांत संघटन मंत्र्याकडे जिल्हा उपाध्यक्ष पदाचा
राजीनामा पाठविला होता.” त्यांनी त्या राजीनाम्याची प्रत आज माध्यमांसमोर सादर केली.

संघ आणि भाजपाच्या विचारधारेत वाढलेले, ‘संघ एक जीवनगाथा’ पुस्तकाचे लेखक व भाजपाचे जेष्ठ नेते
भास्करराव देशपांडे यांचे सुपूत्र म्हणून उदय देशपांडे यांची ओळख आहे. भाजपाची संघटनात्मक वाटचाल
ज्या घरातून सुरू झाली, त्या घरातील वारसालाच आज पक्षाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

हे पण वाचा..

बुलढाण्यात ACB ची मोठी कारवाई! वनविभागाची ACF अश्विनी आपेट लाच घेताना रंगेहात.

नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर निर्माण झालेली नाराजी, अंतर्गत गटबाजी आणि
निवडणूक पराभवामुळे बुलढाणा भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.


📌 वाचकांसाठी आवाहन

अशाच राजकीय घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक बातम्यांसाठी
KattaNews.in ला दररोज भेट द्या.
आपले मत कमेंटमध्ये जरूर कळवा.


🔗 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

राहुल बोंद्रे भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांची टीका — बुलढाणा राजकारण

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांचा मोठा दावा; “जनतेने दोनदा घरी बसवलेल्या व्यक्तीला घेऊन काय फायदा? भाजपने अधिकृत तारीखच दिली नव्हती!”

पालकमंत्री बेपत्ता, बुलढाण्यात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

Leave a Comment