हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सोन्याचे बिस्कीट दाखवून ज्येष्ठ महिलेची ३२ हजारांची फसवणूक; देऊळगाव राजा हादरला

On: December 31, 2025 7:56 AM
Follow Us:
वाशिम पंचायत समिती कार्यालयासमोर 101 नारळ फोडून शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

देऊळगाव राजा/कट्टा न्यूज प्रतिनिधी 

देऊळगाव राजा : सोन्याचे बिस्कीट दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार देऊळगाव राजा तालुक्यात समोर आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोन्याचे बिस्कीट दाखवून फसवणूक करत दोन अज्ञात व्यक्तींनी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन केला. सोन्याचे बिस्कीट दाखवून फसवणूक करून आरोपींनी तब्बल ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची ही घटना आहे.

ही घटना २८ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास देऊळगाव महीं परिसरात घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुमनबाई साहेबराव चेके (वय ६५, रा. सरंबा, ता. देऊळगाव राजा) या देऊळगाव महीं येथे असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याशी संवाद साधला. आरोपींनी स्वतःकडे असलेले सोन्यासारखे दिसणारे बिस्कीट दाखवून विश्वास संपादन केला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

यानंतर चलाखीने आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील सोन्याची फुले असा एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. त्याबदल्यात सोन्यासारखे बिस्कीट देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुमनबाई चेके यांनी तात्काळ देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कलीम देशमुख पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


⚠️ नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

  • अनोळखी व्यक्तींनी दाखवलेल्या सोन्यासारख्या वस्तूंवर विश्वास ठेवू नका
  • दागिने सार्वजनिक ठिकाणी उघडपणे घालणे टाळा
  • संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा

👉 हे पण वाचा..


📢 अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

Leave a Comment