हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारमधील तीन जण गंभीर जखमी

On: December 29, 2025 2:17 PM
Follow Us:
समृद्धी महामार्गावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा भीषण अपघात

कट्टा न्यूज नेटवर्क 

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा अपघात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक झाला आहे. या समृद्धी महामार्ग अपघातात मंत्री प्रतापराव जाधव कारमध्ये नसले तरी त्यांच्या कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर सुरक्षित पोहोचविल्यानंतर त्यांचे अंगरक्षक, सहकारी आणि वाहनचालक हे तिघे मेहकरकडे परत येत असताना रात्री उशिरा समृद्धी महामार्गावर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघात नेमका कसा झाला, वाहनाचा वेग अधिक होता की तांत्रिक बिघाड झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

हे पण वाचा..

मेहकर नगरपालिकेत ‘सत्तासंघर्ष’ पेटला; सत्कार सोहळ्यावरून काँग्रेस-शिंदेसेनेची नाराजी.

समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔴 Breaking Updates साठी Kattanews.in ला Follow करा

राजकारण, अपघात, गुन्हेगारी व स्थानिक बातम्यांचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment