मोताळा | प्रवीण गरुडे कट्टा न्यूज नेटवर्क
अवैध रेती वाहतुकीदरम्यान एका टिप्परमधून पुलावर रेती सांडल्याने भीषण अपघात घडला.
आडविहीर पुलावर रस्त्यावर पसरलेल्या रेतीमुळे दोन चारचाकी गाड्या थेट नाल्यात कोसळल्या.
या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध रेती वाहतूक नागरिकांच्या जीवासाठी किती धोकादायक ठरत आहे,
हे स्पष्ट झाले आहे.
नांदुरा तालुक्यातील एका रेती घाटातून परवानगी असल्याचे सांगत शेकडो टिप्पर, हायवा व ट्रॅक्टरद्वारे
दिवसरात्र रेती, माती व मुरुमाची वाहतूक सुरू आहे.
या वाहनांमधून रस्त्यावर सतत रेती सांडत असल्याने अनेक ठिकाणी वाहने घसरून अपघात होत आहेत.
हे प्रकार नित्याचे असतानाही महसूल व पोलीस विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
२५ डिसेंबरच्या रात्री ९ ते १० वाजेदरम्यान एका अज्ञात टिप्परमधून आडविहीर येथील पुलावर
१०० ते २०० फूट अंतरापर्यंत रेती सांडली.
नागमोडी वळण व अंधारामुळे रस्त्यावरील रेतीचा अंदाज न आल्याने
MH-04-JD-8245 क्रमांकाची कार पुलाचे कठडे तोडून ७० ते ८० फूट खोल नाल्यात कोसळली,
तर MH-19-CF-0069 ही दुसरी कारही अपघातग्रस्त झाली.
या अपघातात ५ ते ६ जण जखमी झाले असून अनेक दुचाकीस्वार व इतर वाहनेही घसरून पडली.
सुदैवाने दोन्ही कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून
पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
धक्कादायक बाब म्हणजे इतक्या मोठ्या घटनेची कुठेही अधिकृत नोंद झालेली नाही.
- बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना: पोटच्या चिमुरड्यांना मृत्यूच्या दारात ढकलून मातेने संपवली जीवनयात्रा.
- घाटपुरी येथील श्री जगदंबा देवी मंदिरात धाडसी चोरी; देवीचे चांदीचे मुकूट, डोळे व मंगळसूत्र लंपास.
- सिंदखेडराजात धक्कादायक प्रकार: ११ वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांचा अतिप्रसंगाचा प्रयत्न; तालुक्यात संताप.










