हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पोखरा योजनेतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; रिसोड पोलिसांत तक्रार दाखल

On: December 27, 2025 8:10 AM
Follow Us:
पोखरा योजनेतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी – रिसोड

नारायणराव आरु पाटील|वाशिम जिल्हा प्रतिनिधी

पोखरा योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार रिसोड तालुक्यात उघडकीस आला आहे.
पोखरा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पोखरा योजनेतील भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.रिसोड तालुक्यातील शेलुखडसे येथील पत्रकार वसंत खडसे हे एका वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने लेखणी चालवणाऱ्या या पत्रकाराने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा योजना) अंतर्गत झालेल्या कथित भ्रष्टाचारावर वृत्तमालिका प्रकाशित केली होती.

पोखरा योजनेतील गैरप्रकारांवर प्रशासनाची दखल

पत्रकार वसंत खडसे यांनी पुराव्यानिशी मुख्यमंत्री, प्रधान सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दि. २६ डिसेंबर रोजी तपास अधिकारी संतोष वाळके यांच्या पथकाने शेलुखडसे येथे भेट देत संबंधित लाभार्थ्यांच्या शेतजमिनी, नेटशेड, फळबाग, वनीकरण व विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली.

धमकीचा प्रकार उघड

तपास अंगलट येत असल्याचे लक्षात येताच आरोपी संजय गजानन खडसे व त्यांची आई लक्ष्मी गजानन खडसे यांनी पत्रकार वसंत खडसे यांच्या पत्नी सौ. अनिता वसंत खडसे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर पत्रकार वसंत खडसे यांनी रिसोड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार श्री. रंजवे पुढील तपास करीत आहेत.

पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पोखरा योजनेतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराला व त्याच्या कुटुंबाला धमकी दिल्याने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


👉 हे पण वाचा..


📌 अधिक स्थानिक, विश्वासार्ह व सत्य बातम्यांसाठी Kattanews.in वाचत रहा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment