हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजात धक्कादायक प्रकार: ११ वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांचा अतिप्रसंगाचा प्रयत्न; तालुक्यात संताप

On: December 26, 2025 11:25 PM
Follow Us:
सिंदखेडराजा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न प्रकरणाची पोलिस चौकशी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सिंदखेडराजा / कट्टा न्यूज नेटवर्क

सिंदखेडराजा तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, बालसुरक्षा आणि सामाजिक संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी दि. २४ डिसेंबर रोजी तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्कार, सामाजिक जाणीव आणि वाढती बालविकृती याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तालुक्यातील एका गावात कनिष्ठ महाविद्यालयाच्या शेजारी हे कुटुंब वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास ११ वर्षीय मुलगी घरात एकटी झाडझूड करीत असताना, शेजारी राहणारे अंदाजे १४ व १५ वर्षे वयाचे दोन अल्पवयीन मुलगे तिच्या घरी आले.

तक्रारीनुसार, यावेळी १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा अल्पवयीन मुलगा बाहेर राखण करत उभा होता. घटनेनंतर मुलीने आईकडे शारीरिक वेदनांची तक्रार केल्यानंतर संशय बळावला.

आईने मुलीला विश्वासात घेत चौकशी केली असता, मुलीने संपूर्ण प्रकार कथन केला. त्यानंतर आईने तत्काळ तालुक्यातील पोलिस ठाण्यात धाव घेत सहाय्यक पोलिस निरीक्षकांसमोर तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अप.क्र. ३५४/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(i), ६५(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत दोन्ही अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार व त्यांचे सहकारी करीत आहेत.

एका अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची ही घटना केवळ गुन्हा नसून समाजमनाला अंतर्मुख करणारी ठरली आहे. पालकांचे दुर्लक्ष, मोबाईल-डिजिटल संस्कृतीचा अतिरेक आणि सामाजिक जबाबदारी यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.


📌 हे पण वाचा..


🔔 अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी KattaNews.in ला दररोज भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment