हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना: पोटच्या चिमुरड्यांना मृत्यूच्या दारात ढकलून मातेने संपवली जीवनयात्रा.

On: December 26, 2025 12:27 PM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना – पोटच्या चिमुरड्यांना मृत्यूच्या दारात ढकलून मातेने संपवली जीवनयात्रा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

लोणार प्रतिनिधी/विनायक कुटे 

बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना ग्रामीण भागाला हादरवून टाकणारी ठरली आहे. कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्थैर्याचे भयावह चित्र समोर आणते. वढव येथे घडलेली बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना समाजमन सुन्न करणारी असून, एका तरुण मातेने आपल्या पोटच्या चिमुरड्यांना मृत्यूच्या दारात ढकलून स्वतः जीवन संपवले. या बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.वढव येथील कांचन अमोल सोनुने (वय २२) या तरुण विवाहितेने आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या आकांक्षा आणि सहा महिन्यांच्या प्रांजल या चिमुरड्यांना गळफास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने स्वतःही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. काही मिनिटांतच हसता-खेळता संसार उद्ध्वस्त झाला.दैव बलवत्तर ठरल्याने फासाची दोरी निसटली आणि दोन्ही चिमुरड्या खाली पडल्या. बंद घरातून येणाऱ्या रडण्याच्या आवाजाने गावकऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. समोरचे दृश्य पाहून प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघाले. खाली दोन्ही बालिका मृत्यूशी झुंज देत होत्या.

या प्रकरणी लोणार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने ग्रामीण भागातील कौटुंबिक कलह, आर्थिक तणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.


👉 तुमचे मत काय?

अशा घटना रोखण्यासाठी मानसिक आरोग्याबाबत जनजागृती आणि समुपदेशन केंद्रांची गरज आहे का? खाली कमेंट करून आपले मत नोंदवा.

🔔 हे पण वाचा…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment