नगर परिषद देऊळगाव राजा जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

खामगावात जिनिंगला भीषण आग; MIDC मधील भारत जिनिंग कारखान्यात मोठे नुकसान

On: December 25, 2025 11:19 AM
Follow Us:
खामगाव MIDC परिसरातील भारत जिनिंग कारखान्याला लागलेली भीषण आग

खामगाव / प्रतिभा पदमने

खामगाव : खामगाव एमआयडीसी (MIDC) परिसरातील भारत जिनिंग कारखान्याला आग लागल्याची घटना बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी घडली. खामगाव जिनिंग आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, खामगाव MIDC आग प्रकरणात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दुपारच्या सुमारास जिनिंगच्या एका भागातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत जिनिंगमधील कापसाचा साठा, विद्युत यंत्रणा व यंत्रसामग्रीला वेढा दिला. आगीचे प्रचंड लोळ व दाट धुरामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

आग लागल्याचे लक्षात येताच कारखान्यातील कामगार व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत जिनिंगमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब (MIDC) घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत मोठ्या प्रमाणात कापूस, विद्युत वायरिंग तसेच काही यंत्रसामग्री जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे खामगाव औद्योगिक परिसर MIDC पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीने चर्चेत आला असून, जिनिंग व कारखान्यांमधील विद्युत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून, आगीचे नेमके कारण तपासले जात आहे.

 


📲 अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी Katta News ला Follow करा

खामगाव, बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी वाचा — Kattanews.in


🔗 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथे निकृष्ट रेशन तांदळाच्या निषेधार्थ संतोष भुतेकर यांनी तहसील कार्यालयात तांदूळ भेट दिला

देऊळगाव राजात निकृष्ट रेशन तांदळाचा अनोखा निषेध; पुरवठा अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिला तांदूळ!

बुलढाणा न्यायालयाने चिखलीतील बालिका अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास सुनावला

बुलढाणा न्यायालयाचा मोठा निर्णय! चिखलीतील ८ वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

आडगाव राजा पाणीपुरवठ्यासाठी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या देताना ग्रामस्थ

पाणीपुरवठ्यासाठी आडगाव राजा ग्रामस्थांचा सिंदखेडराजा पंचायत समितीत ठिय्या! आठ दिवसांत नळाला पाणी देण्याचे लेखी आश्वासन

सुलतानपूर येथे मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून रोकड आणि शासकीय लॅपटॉपची बॅग चोरी

सुलतानपुरात वाहतूक कोंडीत संधी साधली! मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून ५० हजारांची रोकड, शासकीय लॅपटॉप चोरीला

सणासुदीत घरफोडी टाळण्यासाठी धाड पोलिसांनी नागरिकांना दिलेल्या सुरक्षा सूचना

सणासुदीत घर बंद करून बाहेर जाताय? धाड पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या सुरक्षा सूचना

रताळी येथे शेतकरी कुटुंबांशी चर्चा करताना आमदार रोहित पवार

रात्री ११ वाजता शेतकरी कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी पोहोचले रोहित पवार; मदतीत अडवणूक झाल्यास थेट फोन करण्याचे आवाहन

Leave a comment