हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

‘ऑन ड्यूटी’ पोलिसावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला! कर्तव्यावर जातानाच बेदम मारहाण; बुलढाणा बसस्थानक हादरले.

On: December 21, 2025 6:42 AM
Follow Us:
बुलढाणा बसस्थानकात ऑन ड्यूटी पोलिसावर जीवघेणा हल्ला

बुलढाणा प्रतिनिधी/भागवत गायकवाड 

बुलढाणा शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात ऑन ड्यूटी पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
कर्तव्यावर जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली.
या ऑन ड्यूटी पोलिसावर हल्ला प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

धाड पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले नारायण गजानन चाटे (वय ३७) हे शासकीय कामासाठी नागपूर हायकोर्ट येथे जाण्यासाठी
१८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बुलढाणा बसस्थानकात आले होते.

यावेळी तीन जणांच्या टोळक्याने कोणतीही शहानिशा न करता त्यांना अडवले.
‘तू लहान मुलाला का मारले?’ असा बनाव करत आरोपींनी चाटे यांची कॉलर पकडून शिवीगाळ सुरू केली.
आपण पोलिस कर्मचारी असून ड्यूटीवर जात असल्याचे सांगूनही आरोपींनी काहीही ऐकले नाही.

नशेत किंवा गुन्हेगारी वृत्तीने पिसाळलेल्या आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत
एका बोथट हत्याराने चाटे यांच्या डोक्यावर, डोळ्याखाली व ओठावर प्रहार केला.
या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या
कलम १३२, ११८ (१), ११५, ३५२, ३५१ (२) व (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर करीत आहेत.

कर्तव्यावर असलेल्या पोलिसावरच असा हल्ला झाल्याने पोलीस दलात तीव्र संताप व्यक्त होत असून
गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

👉 ताज्या क्राईम अपडेटसाठी KattaNews.in फॉलो करा.
सर्वात आधी बातम्या वाचा – सत्य, वेगवान आणि निर्भीड!

हे पण वाचा…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Buldhana News समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Buldhana News: एक टायर फुटला अन् क्षणात सगळं संपलं! समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू,९ गंभीर

बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक निवडणुकीत 94 टक्के मतदान

Buldhana News: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसाठी 94% मतदान; आज निकाल, कोण बाजी मारणार ? संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

Chikhli Buldhana News पिस्टलसह सराईत गुन्हेगार ताब्यात

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! सराईत गुन्हेगार पिस्टलसह ताब्यात; ₹45 हजारांचे अग्नीशस्त्र जप्त

शिंदीच्या निलेश खरात यांची कतार एअरवेजमध्ये निवड

शिंदीच्या छोट्या गावातून थेट कतार एअरवेजमध्ये झेप; निलेश खरातने मेहनतीच्या जोरावर साकारले आकाशात उडण्याचे स्वप्न

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा एल्गार; २७ ऑगस्टला मुंबईत मंत्र्यांचे बंगले-गाड्या जप्त करून लिलावाचा इशारा

Buldhana News घरकुल लाभार्थी यादीवर हरकत सिंदखेड राजा

Buldhana News: घरकुल लाभार्थी यादीवर हरकत; सिंदखेड राजा तालुक्यात सखोल चौकशीची मागणी

Leave a Comment