हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

एमओ’कडून आर्थिक लूट! कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याच्या उपचार बिलासाठी ३० हजारांची लाच; वरवंड PHC मधील धक्कादायक प्रकार.

On: December 19, 2025 3:50 PM
Follow Us:
एमओ’कडून आर्थिक लूट! कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याच्या उपचार बिलासाठी ३० हजारांची लाच; वरवंड PHC मधील धक्कादायक प्रकार.

विशाल गवई/कट्टा न्यूज नेटवर्क 

वरवंड PHC भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या कर्मचाऱ्यालाही लाच द्यावी लागत आहे. कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याच्या उपचार बिलासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यावर झाला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण आरोग्य विभागात संतापाची लाट उसळली आहे.

कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत असलेला हा कर्मचारी आधीच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. उपचारासाठी नोकरीतील सर्व जमापुंजी संपवून, नातेवाइकांकडून उसनवारी, व्याजाने घेतलेले पैसे आणि पतसंस्थांचे कर्ज उचलून त्याने उपचार सुरू ठेवले. शासनाकडे सादर केलेल्या सुमारे १४ लाख ८४ हजार रुपयांच्या मेडिकल बिलांचा प्रस्ताव मंजूर झाला.मंजूर रक्कम वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खात्यात जमा होऊनही संबंधित कर्मचाऱ्याला देयक अदा करण्यात आले नाही. उलट, “३० हजार रुपये दिल्याशिवाय सह्या होणार नाहीत,” असा स्पष्ट निरोप कर्मचाऱ्याला देण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार वरवंड PHC भ्रष्टाचार किती गंभीर आहे, हे स्पष्ट करतो.

१८ डिसेंबर रोजी कारंजा चौकातील एका मोबाइल शॉपीवर पैसे आणून देण्यास सांगण्यात आल्याचेही सूत्रांकडून समजते. यानंतर व्हॉट्सअॅप कॉलद्वारेही मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोप पीडित कर्मचाऱ्याने केला आहे.

कॅन्सरवरील उपचारासाठी आतापर्यंत जवळपास ५० लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेऊनही हा कर्मचारी आज आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

“जर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची ही अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल उपस्थित होत असून, आरोग्य विभागातील लाचखोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

🔔 महत्त्वाची बातमी वाचा आणि शेअर करा

अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा एक शेअर पीडिताला न्याय मिळवून देऊ शकतो.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment