हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोताळा‌ तालुक्यात मका खाल्ल्याने ७० मेंढ्यांचा मृत्यू; मेंढपाळ नाना गोरे यांचे लाखोंचे नुकसान.

On: December 16, 2025 9:53 AM
Follow Us:
मोताळा तालुक्यात रिधोरा खंडोपंत येथे मका खाल्ल्याने ७० मेंढ्या दगावल्याची घटना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन
मोताळा, प्रवीण गरुडे (प्रतिनिधी)
मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोपंत येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मका खाल्ल्याने मेंढ्या दगावल्याची ही घटना असून, मोताळा मेंढ्या मृत्यू प्रकरणात चरण्यासाठी सोडलेल्या तब्बल ७० मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. ही Motala sheep death घटना सध्या बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.मोताळा तालुक्यातील सहस्त्रमुळी येथील मेंढपाळ नाना चेत्रू गोरे हे वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून मेंढीपालन करतात. उदरनिर्वाहासाठी ते नेहमी मेंढ्यांसह विविध भागात चरण्यासाठी भटकंती करतात. १३ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान त्यांनी आपल्या मेंढ्या रिधोरा खंडोपंत शिवारातील मक्याच्या शेतात चरण्यासाठी सोडल्या.

सदर शेतातील मका हार्वेस्टरने काढलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कणसे व मका शिल्लक होता. ही बाब मेंढपाळाच्या लक्षात न आल्याने मेंढ्यांनी मोठ्या प्रमाणात मका खाल्ला. काही वेळातच मेंढ्यांची प्रकृती खालावली आणि पाहता पाहता जवळपास ७० मेंढ्या दगावल्या.

घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. दांडगे यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. तपासणीत प्रत्येक मेंढीच्या पोटात सुमारे एक ते दीड किलो मका आढळून आला. त्यामुळेच मका खाल्ल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाला आहे.

या घटनेमुळे मेंढपाळ नाना चेत्रू गोरे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. अशा प्रकारच्या पशुधन दुर्घटना टाळण्यासाठी शेतकरी व पशुपालकांनी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

वाचकांसाठी आवाहन

आपल्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या, विश्वासार्ह आणि उपयुक्त बातम्यांसाठी KattaNews.in ला Follow करा.

हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment