हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
तळप सर्कल हॉट! सेवानिवृत्त महसूल अधिकारी अरुSoybean Rate : शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा मागणीवजा अरBreaking: चोर्हाळा येथे कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याचLadki Bahin Yojana eKYC 2025 : लाडकी बहीण योजना eKYC सुरू, शेवटची ताअनुदान द्या नाहीतर मतदान नाही!” – वाशिम जिल्हधामणगाव बढे परिसरात ढगफुटीसदृश पावसाने हाहा

संविधान दिनी मविआचा चिखलीला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प — काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन

On: November 28, 2025 1:45 PM
Follow Us:
चिखली येथे संविधान दिनी मविआचा भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त संकल्प आणि काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

चिखली प्रतिनिधी/विशाल गवई 

संविधान दिनी चिखली शहरात महाविकास आघाडीने भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त चिखलीचा संकल्प व्यक्त केला. लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बांधिलकीचे संवैधानिक मूल्य अधोरेखित करत बुधवार रोजी जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून महाविकास आघाडीने संविधान दिन साजरा केला.

याच शुभप्रसंगी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन माजी आमदार धृपतराव सावळे, काँग्रेसचे जेष्ठ नेते संदेशजी आंबेडकर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. परिसरात घोषणाबाजी, उत्साह आणि एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही घटक पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार, विविध समाजघटक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर महाविकास आघाडीचा प्रचार अधिक जोमाने सुरू झाल्याचे चित्र शहरभर स्पष्ट दिसले. या प्रतिसादामुळे आघाडीचा जनाधार वाढत असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हे पण वाचा.

चिखलीत अजितदादांचा जोरदार संदेश: ‘प्राचार्य निलेश गावंडेनाच शहराची जबाबदारी द्या’ – परिवर्तन सभेला विक्रमी प्रतिसाद

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करत भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख चिखली घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की चिखलीच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि सुशासनाधिष्ठित विकासासाठी आघाडी कटिबद्ध असून, नागरिकांना सुलभ सुविधा, भेदभावमुक्त प्रशासन, स्वच्छता आणि पारदर्शक निधीवापर या क्षेत्रांत क्रांतिकारी बदल घडवले जातील.

हे पण वाचा.

२ किलो गांजा जप्त! बुलढाणा LCB ची धडक कारवाई, ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!