बुलढाणा /भागवत गायकवाड
बुलडाणा शहरात अवैध रेती वाहतूक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशच्या रॉयल्टीचा गैरवापर होत असल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी पहाटे अचानक सापळा रचून अवैध रेती वाहतूक करणारा मीनी टिप्पर पकडला.
या प्रकरणात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांनी बुऱ्हानपूर (मध्यप्रदेश) रॉयल्टीचा वापर केल्याचा दावा केला असला तरी ती रॉयल्टी खरी आहे की नाही, याबाबत मोठा संशय निर्माण झाला आहे. हे सर्व पाहता जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
२१ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजता मलकापूर रोडवरील रिलायन्स मॉलसमोर पाळत ठेवताना एमएच-१९-सीएक्स-२८९५ क्रमांकाचा टिप्पर दिसला. तहसीलदारांनी वाहन अडवून चालक गोकुळ कांडेलकर याच्याकडे परवानगीपत्राची विचारणा केली. त्याने बुऱ्हानपूर घाटाची रॉयल्टी दाखवली, मात्र तिची मुदत संपलेली होती. संशय वाढताच टिप्पर ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.
हे पण वाचा.
सिंदखेडराजा तहसील आवारातून जप्त जेसीबी पळवली! तहसीलदार दिवटे यांचा थरारक पाठलाग — 2 आरोपी अटक
घाटाखालील वाळूमाफियांनी पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसून एमपी रॉयल्टी दाखवून वाहतूक सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु ही रॉयल्टी खरोखर बुऱ्हानपूरची आहे की इतरत्र छापून फसवणूक केली जाते, याचा शोध प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
अवैध रेती वाहतूकीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची कडक भूमिका
बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी वाळूमाफियांविरुद्ध मोहीम राबवल्यानंतर घाटावरील मोठ्या प्रमाणातील तस्करीवर आळा बसला. मात्र घाटाखालील मार्गांनी अवैध वाहतूक सुरू असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी तातडीने कारवाई करत टिप्पर सीज केला आणि दंडात्मक प्रस्ताव तयार केला आहे. यामुळे रेती माफियांचे हालचाली पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत.
👉 आमच्या Kattanews.in ला Follow करा
महाराष्ट्रातील न.1 स्थानिक डिजिटल न्यूज पोर्टल— वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या मिळवण्यासाठी Kattanews.in ला Follow करा.










