हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
आडगाव राजा गावाचा संताप उफाळला! BSNL–Airtel नेटवर्क साखरखेर्डा पोलिसांचा शेंदुर्जनमध्ये जुगार देऊळगाव राजा : डीपी रोडवरील अतिक्रमणावरून वाSoyabean Rate Today in Buldhana | बुलढाणा जिल्ह्यातील आजचे सोयाबचिखलीत मुख्यमंत्री फडणवीसांची गगनभेदी सभा; शआजचे राशिभविष्य (Today Rashi Bhavishya in Marathi) | 1 नोव्हेंबर 2025 |

सारंगवाडी तलावात कोट्यवधींचा महाघोटाळा! 16 कोटींचा प्रकल्प 280 कोटींवर; 239 कोटी खर्च… पण काम कुठे? — राहुल बोंद्रे यांचा गौप्यस्फोट

On: November 23, 2025 8:29 AM
Follow Us:
सारंगवाडी तलावात कोट्यवधींचा महाघोटाळा! 16 कोटींचा प्रकल्प 280 कोटींवर; 239 कोटी खर्च

चिखली/विशाल गवई 

सारंगवाडी तलाव घोटाळा सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत.या सारंगवाडी तलाव घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केला असून, 16 कोटींच्या मूळ निविदेला 280 कोटींची किंमत मंजूर करून आतापर्यंत 239 कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवले गेले, पण प्रत्यक्षात काम शून्य टक्के असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या सारंगवाडी तलावात कोट्यवधींचा महाघोटाळाप्रकल्पात जलसंधारण विभाग, काही तत्कालीन अधिकारी, ठेकेदार आणि विद्यमान सत्ताधारी यांच्या संगनमतातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी जोरदारपणे मांडली.


📌 16.61 कोटींचा प्रकल्प 280.64 कोटींवर — 1700% वाढ कशासाठी?

राहुल भाऊ बोंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये मंजूर झालेल्या सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पाची मूळ निविदा किंमत केवळ 16.61 कोटी होती.

परंतु 2022 मध्ये सुधारित निविदा 197.21 कोटीवर पोहोचली. आणि 2024 मध्ये आणखी वाढ देत प्रकल्पाची किंमत तब्बल 280.64 कोटी करण्यात आली.

  • 🔹 मूळ निविदा (2009): 16.61 कोटी
  • 🔹 प्रथम सुधारित मान्यता (2022): 197.21 कोटी
  • 🔹 द्वितीय सुधारणा (2024): 280.64 कोटी

इतकी प्रचंड वाढ असूनही प्रकल्प साईटवर काहीच प्रगती नाही, हेच सर्वात मोठे संशयाचे कारण असल्याचे बोंद्रे म्हणाले.


📌 सारंगवाडी तलाव प्रकल्प 239 कोटी खर्च… पण प्रत्यक्षात काम कोठे?

आजपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 22 R.A. Billsद्वारे सुमारे 239 कोटी रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत.

पण साईटवर गेल्यावर केवळ कोरडी जमीन, काही पोकळ खड्डे आणि अपूर्ण बांधकाम एवढाच प्रकार दिसतो.

“सरकारकडून पैसे उकळण्यासाठी ‘कागदोपत्री पूर्ण काम’ दाखवले जाते, पण प्रत्यक्षात काम उभेच नाही,” असा थेट आरोप बोंद्रे यांनी केला.


📌 9,94,666 घनमीटर माती-मुरूम दाखवले! पण साईटवर डंपरच चढू शकत नाही!

प्रकल्पात अडचणी दाखवण्यासाठी “माती-मुरूम उपलब्ध नाही” असा दावा करून ठेकेदार कंपनीने सुमारे 9,94,666 घनमीटर सामग्री 8, 17 आणि 20 किलोमीटर अंतरावरून आणल्याचे दाखवले आहे.

परंतु —
साईटचा रस्ता इतका तीव्र उताराचा आहे की त्या ठिकाणी डंपर चढू शकत नाहीत!

जर खरोखर 9.94 लाख घनमीटर मुरूम आणलं असतं तर यासाठी जवळपास 1 लाख डंपर ट्रिप लागल्या असत्या — जे प्रत्यक्षात अशक्य असल्याचे बोंद्रे म्हणतात.


📌 सारंगवाडी तलाव प्रकल्प चे ‘पूर्ण काम’ दाखवून 2.38 कोटींचं बिल — काम मात्र अजूनही सुरू!

R.A. Bill No. 20 मध्ये ‘Full Completed Work’ दाखवले गेले आणि 2.38 कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आले.

परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी आजही काम सुरू आहे. जे काम झालेच नाही त्याचे पैसे कसे दिले गेले, असा प्रश्न बोंद्रे यांनी केला.

या बिलावर कार्यकारी अभियंता अमोल मुंडे आणि उपअभियंता सचिन शिंदे यांच्या सह्या आहेत.


📌 22.56 कोटींचा गौण खनिज दंड!

ठेकेदार कंपनीने नियमबाह्य पद्धतीने हजारो ट्रिप मुरूम काढल्याचा संशय आल्याने तहसीलदार कार्यालयाने तब्बल
₹22,56,50,400/-
इतका दंड ठोठावला आहे.

या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे देखील पाठवण्यात आली आहे.

हे पण वाचा.

चिखलीत पहिल्यांदाच चौरंगी लढत! कोण मारेल बाजी — भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी की बीएसपी?


📌 तक्रारदारांना धमक्या? पोलिसांवरही दबाव?

किन्ही नाईकचे माजी सरपंच ज्ञानेश्वर ननकर यांनी अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये या घोटाळ्याची तक्रार दिली. API निर्मळ यांनी प्रत्यक्ष साईटवर जाऊन पंचनामा केला.

पण अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या पत्रांना उत्तरे दिली नाहीत.
महत्वाचे म्हणजे —
विद्यमान आमदार व त्यांचे पती यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप बोंद्रे यांनी केला आहे.

ठेकेदार कंपनीने उलट तक्रारदारांवरच ‘खंडणी मागितली’ असा आरोप करत बदनामी करण्याचा प्रयत्न केला — याला बोंद्रे यांनी “चोराच्या उलट्या बोंबा” म्हटले.

हे पण वाचा.

सिंदखेडराजा तहसील आवारातून जप्त जेसीबी पळवली! तहसीलदार दिवटे यांचा थरारक पाठलाग — 2 आरोपी अटक


📌 प्रत्यक्ष खुदाई दाखवा — बोंद्रे यांचे आव्हान

बोंद्रे म्हणाले की:

  • 🔸 8, 17 आणि 20 किमीवरील कथित खुदाई स्थळे प्रत्यक्ष दाखवा
  • 🔸 खाजगी जमिनीवरील खुदाईची रॉयल्टी कागदपत्रे सादर करा
  • 🔸 डंपर ट्रिपचे GPS रेकॉर्ड दाखवा
  • 🔸 239 कोटी रुपये कुठे गेले त्याचा खुला लेखाजोखा द्या

“धाडस असेल तर विद्यमान आमदारांनी साईटवर येऊन सार्वजनिक खुलासा करावा,” असे आव्हान त्यांनी दिले.

 बुलढाण्यातील सर्वात मोठा घोटाळा?

सारंगवाडी तलाव प्रकल्पातील संशयास्पद किंमतवाढ, कागदोपत्री बनवलेली माती-मुरूम वाहतूक, पूर्ण काम दाखवून बिलांची उचल, अधिकाऱ्यांचे मौन, राजकीय हस्तक्षेप आणि तक्रारदारांवरील दबाव — हे सर्व एकत्र पाहिल्यास हा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा महाघोटाळा असल्याची शक्यता अधिकच दृढ होत आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत आणि सत्य समोर यावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.


📢 तुमचा आवाज महत्वाचा!

👉 KattaNews.in महाराष्ट्रातील नंबर 1 लोकल डिजिटल न्यूज पोर्टल.
👉 भ्रष्टाचारावरील सर्व अपडेट्स, जिल्हा-तालुका स्तरावरील एक्सक्लुझिव्ह बातम्या, आणि Ground रिपोर्टिंग — फक्त आमच्याकडे!
👉 बातमी शेअर करा आणि तुमचा प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की द्या.


🔗 हे पण वाचा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!