हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दुसऱ्या पत्नीसोबत असताना पतीने पहिल्या पत्नीच्या दुचाकीला कारने दिली धडक; शहरात खळबळ.

On: November 10, 2025 2:50 PM
Follow Us:

बुलढाणा: शहरातील भाजप कार्यालयाजवळ दुसऱ्या पत्नीसोबत कारने फिरत असलेल्या पतीने पहिल्या पत्नीच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणी पती पत्नी वाद आणि दुसरे लग्न या पार्श्वभूमीवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलढाणा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी मनिषा मिलिंद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे व मिलिंद श्रीराम जाधव यांचे सन २००३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघांना १७ वर्षांची मुलगी आहे. मात्र, विवाहानंतर काही वर्षांनी पतीने अर्चना नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केले. यामुळे घरगुती वाद वाढत गेला. काही काळ दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र २०१४ पासून मनिषा पुन्हा आपल्या पतीसोबत राहू लागल्या.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

८ नोव्हेंबर रोजी मुलीला शाळेतून आणण्याच्या कारणावरून दाम्पत्यात वाद झाला. त्यानंतर मनिषा सासूकडे बोलण्यासाठी जात असताना भाजप कार्यालयाजवळ मिलिंद जाधव हे दुसऱ्या पत्नीसोबत कारने आले. मनिषा यांनी तब्येतीची विचारपूस करताच पतीने अचानक कार चालवत त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत मनिषा यांच्या हाताला, पायाला आणि कमरेला दुखापत झाली. स्थानिकांनी तत्काळ मदत करून मनिषा यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्या आणि त्यांच्या वडिलांनी एकत्र शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हे पण वाचा.

पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; युवक काँग्रेस शहराध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल, चिखलीत खळबळ.

Buldhana : बुलढाण्यात अवैध गर्भलिंग चाचणी रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर ताब्यात

घटनेनंतर परिसरात चर्चा रंगली असून दुसऱ्या लग्नामुळे निर्माण होणारे कुटुंबीय वाद आणि तणाव पुन्हा एकदा समोर आले आहेत.

पोलिस तपास सुरू

शहर पोलिसांनी घटना स्थळाजवळील CCTV फुटेज, वाहनाची तपासणी आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती घेत चौकशी सुरू केली आहे.


👉 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी भेट द्या — Kattanews.in

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

Leave a Comment