उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी देखील या साखरखेर्डा पोलिस कारवाईचे समाधान व्यक्त केले आहे.
शेंदुर्जन येथे वरली मटका, जुगार पत्ते खेळ तसेच अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शेंदुर्जन परिसरात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकण्यात आला. या वेळी १४,३२० रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल फोन, जुगार साहित्य आणि चटई असा एकूण २४,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रमेश शिवाजी शिंगणे (४८), सदाशिव सखाराम नागरे (४०), बाळाराम प्रकाश परसने (३५) रा. शेंदुर्जन, गौतम पुंजाजी काकडे (४८) रा. देऊळगाव कोळ, पवन भिवसन साळवे (३४) रा. मलकापूर पांगरा, ज्ञानेश्वर उत्तम नागरे (४५) रा. भंडारी आणि प्रविण अंबादास उगलमुगले (३८) रा. जागदरी या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे.
हे पण वाचा.
मेहकर हादरले! चिमुकलीचा मृतदेह मोकाट कुत्र्यांनी उकरून विद्रुप केला; शहरात खळबळ.
मलकापूरच्या CA युवतीचा मुंबईत अपघाती मृत्यू; फेब्रुवारीत होणार होतं लग्न, शहरात शोककळा.
आरोपींवर कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस कर्मचारी गणेश भगवान फड, डिगांबर चव्हाण, सुनील देशमुख, किशोर बोरे, किशोर सांगळे, बंद्री शिंदे आणि चालक सलीम गवळी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास बीट जमादार रामदास वैराळ करीत आहेत.
📌 साखरखेर्डा बुलढाणा जिल्ह्यातील आणि परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दररोज भेट द्या → KattaNews.in
📲 आपल्या गावचा बुलंद आवाज बना प्रतिनिधी बनून आत्ताच क्लिक करा 👉 WhatsApp करा.










