देऊळगाव राजा/ प्रतिनिधी
देऊळगाव राजा डीपी रोड वर सुरू असलेल्या डीपी रोड अतिक्रमण प्रकरणामुळे शहरात मोठा वाद पेटला आहे. या डीपी रोड अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाहतुकीतील अडथळे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात भाजपा शहराध्यक्ष तक्रार घेऊन पुढे आले आहेत.
देऊळगाव राजा नगरपरिषद कडे यापूर्वीही नागरिकांकडून तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र कारवाई न झाल्याने संताप वाढला आहे.
देऊळगाव राजा शहरातील दक्षिण चालीन परिसरातील हा डीपी रोड पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय तसेच विविध सरकारी कार्यालयांकडे जाणारा मुख्य मार्ग आहे.
मात्र काही नागरिकांनी परवानगीशिवाय रस्ता अडवत बांधकाम सुरू केल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
अर्जदार अर्चना भोपाल डोंगणावकर आणि प्रशांत पन्नालाल डोंगणावकर यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना लेखी तक्रार देत अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलीस स्टेशनलाही प्रत पाठवली आहे.
हे पण वाचा.
भाजपा शहराध्यक्षांचा इशारा :
“डीपी रोड हा नागरिकांचा सार्वजनिक मार्ग आहे. दबंगगिरीच्या जोरावर रस्ता अडवू देणार नाही. प्रशासनाने कारवाई केली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक संवेदनशील बनला असून शहरात “अतिक्रमण हटवलं जाणार का?” हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील व देश विदेशातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या kattanews.in या वेब पोर्टल ला भेट द्या.










