Washim : कृषिदूतानी दिले अंतर मशागतीचे प्रात्यक्षिक.

 

रिसोड प्रतिनिधी/प्रदीप देशमुख

 

कृषि अभियांत्रिकी विभागाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्न कृषी महाविद्यालय, वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड (risod) येथील चतुर्थ वर्षाच्या कृषिदूतांनी ग्राम भोकरखेड येथे शेतकरी बांधवांना पिकातील अंतर मशागत सुधारित यंत्रानी करून दाखवली व त्याचे फायदे सांगितले. या मध्ये त्यांनी तन नियंत्रणासाठी तिन्ही प्रकारच्या पद्धतीची माहिती दिली जसे खुरपन, डवरणी व फवारणी यांच्या फायद्या सोबतच ते आधुनिक पद्धतीने व सुधारित यंत्राने कशा पद्धतीने करायचे व यामुळे अल्पावधीत तण नियंत्रित करण्यास मदत होऊन काय फायदे आहेत त्याबद्दल तांत्रिक माहिती दिली.

 

 

 

 

या वेळी कृषिदूत म्हणून कार्य करणारे विद्यार्थी आदित्य दराडे, ऋषिकेश पवार, माधव जोजार, जयेश देशमुख, राहुल गहूकर आणि प्रवीण भुक्या उपस्थित असणाऱ्या शेतकरी केशव रंजवे, संतोष लांडगे व इतर प्रगतशील शेतकऱ्यांना दिली. सदर प्रात्यक्षिक विषय विशेषतज्ञ (कृषी अभियांत्रिकी) प्रा. मनोज वि. जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या करिता कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर, तांत्रिक समन्वयक आर. एस. डवरे व रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. डी. डी. मसुडकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. बाजड यांच्या समन्वयाने प्रात्यक्षिक घेण्यात आले.