buldhana : देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना दीपक बनसोडे यांना वीरमरण ; त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

buldhana :तालुक्यातील पळसखेड नागो येथील दीपक बनसोड deepak bansode यांना देश रक्षणाचे कर्तव्य बजावत असताना  वीरमरण आले. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मूळ गाव पळसखेड नागो palskhed nago येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र दीपक बनसोडे गत ५ वर्षापासून सैन्य दलात राष्ट्रीय रायफलच्या युनिट १२ महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. २२ सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या लंगेट, कुपवाडा येथे कर्तव्यावर असताना त्यांना  जखमी अवस्थेत त्यांना मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

 

 

परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. २४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबई येथे विमानाने त्यांचे पार्थिव आणण्यात आले. रात्री ११ वाजता अॅम्बुलन्सद्वारे ते बुलढाणा येथे आणण्यात आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ते ठेवण्यात आले होते. २५ सप्टेंबर रोजी सकाळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार्थिव ‘पळसखेड नागो’ येथे आणण्यात आले. दुपारी एक वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशान, पोलिस प्रशासनासह विविध राजकीय नेते देखील उपस्थित होते. २४ सप्टेंबर रोजी ते सुटीवर गावी येणार होते. परंतू दुर्देवाने कर्तव्यावर असताना अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक बहीण, आई-वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे.