
वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील
वाशिम जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रिसोड तालुका सहसचिव यांना लिंगा कोतवाल येथिल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी दि.१आक्टो. रोजी एकेरी भाषेचा वापर करून अपमानित केले होते.त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निनाद भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष अरुण भगवानराव क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली रिसोड गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.व सदर मुख्याध्यापक यांच्या वरती कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन देतांना सांगितले यावेळी उपस्थित शहराध्यक्ष प्रदिप खंडारे,रामेश्वर रंजवे, प्रदिप देशमुख, संतोष जुमडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.