KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

दुसऱ्या ग्रामपंचायतीचा पदभारही नाही, तरी डोणगावचा पदभार घेण्यास नकार; गजानन मवाळ यांच्या भूमिकेने प्रशासकीय पेच!

On: November 24, 2026 7:47 AM
Follow Us:
डोणगाव ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारण्यास गजानन मवाळ यांचा नकार

डोणगाव (जि. बुलढाणा) | माधव भांदुर्गे 

KattaNews जाहिरात 1

डोणगाव ग्रामपंचायतीच्या पदभार हस्तांतरणावरून प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. नव्याने नियुक्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी गजानन पंजाब्रव मवाळ हे डोणगाव ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारण्यास नकार देत असल्याची लेखी तक्रार विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांनी मेहकर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे, मवाळ यांच्याकडे अन्य कोणत्याही ग्रामपंचायतीचा पदभार नसतानाही त्यांनी डोणगावचा पदभार स्वीकारण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

KattaNews जाहिरात 2

पंचायत समिती मेहकर यांच्या जा.क्र. पंसमे/पंचायत/२९५६/२०२६, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या बदली आदेशानुसार विजय केशवराव दांडगे यांची डोणगाव येथून ग्रामपंचायत बेलगाव येथे बदली करण्यात आली आहे. सदर आदेश त्यांना ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्राप्त झाला. या आदेशानुसार डोणगाव ग्रामपंचायतीच्या अधिकारीपदी गजानन पंजाब्रव मवाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

KattaNews जाहिरात 3

बदली आदेशानंतर पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विजय दांडगे यांनी ९ नोव्हेंबर आणि १३ नोव्हेंबर २०२६ रोजी गजानन मवाळ यांना डोणगाव ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारण्याची विनंती केली. मात्र, दोन्ही वेळेस मवाळ यांनी ‘मी डोणगावचा पदभार घेत नाही,’ असे स्पष्ट सांगून पदभार स्वीकारण्यास नकार दिल्याचे दांडगे यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

KattaNews जाहिरात 4

डोणगाव ग्रामपंचायतीचा पदभार हस्तांतरित केल्याशिवाय बेलगाव ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारणे शक्य नसल्याचे विजय दांडगे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. डोणगाव ग्रामपंचायतीची पदभार यादी तयार असून पदभार स्वीकारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच गजानन मवाळ यांच्याकडे अन्य कोणत्याही ग्रामपंचायतीचा पदभार नसल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या बदली आदेशानंतरही प्रत्यक्ष पदभार हस्तांतरण का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका बाजूला बदली आदेशानुसार नवीन अधिकारी नियुक्त झालेले असताना दुसऱ्या बाजूला पदभार स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर विजय दांडगे यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे. गजानन मवाळ यांना वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून डोणगाव ग्रामपंचायतीचा पदभार तात्काळ स्वीकारण्याबाबत सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात आणि पदभार हस्तांतरणाचा हा तिढा कधी सुटतो, याकडे डोणगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गजानन मवाळ यांची पदभार स्वीकारण्यास नकार देण्यामागील भूमिका किंवा कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांची बाजू समोर आल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल.

बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 https://kattanews.in/ Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!

📲 बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Join WhatsApp Group

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

खडकपूर्णा प्रकल्पातील शेतीच्या मोटारी बंद करण्याच्या प्रयत्नाला विरोध करणारे शेतकरी

आधी अवैध रेती उपसा बंद करा, मगच मोटारी बंद करा! खडकपूर्णा प्रकल्पावर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा

अमडापूर शिवारात गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात तीन जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी पथकाची संयुक्त कारवाई

अमडापुरात गोठ्यात सुरू होता अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार! तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई; पिता-पुत्रासह तिघांना अटक

घाटबोरी येथे चोरीला गेलेले सोयाबीनचे कट्टे

घाटबोरीत शेतकऱ्याला मोठा फटका! गोडाउनबाहेरचे १६ कट्टे सोयाबीन चोरीला

साखरखेर्डा येथील गायखेडी तलावातून अवैध पाणी उपशावर कारवाई करताना महसूल अधिकारी

साखरखेर्ड्यात महसूल विभागाची धडक कारवाई; गायखेडी तलावातून पाणी उपसा करणारे १० मोटारपंप जप्त

चिखली नगरपरिषदेच्या प्रस्तावित बॉम्बे मार्केट BOT प्रकल्पाशी संबंधित बाजारपेठ

पाच मिनिटांत २१ विषय मंजूर? चिखली नगरपरिषदेच्या सभेवर विरोधकांचे गंभीर आक्षेप

साखरखेर्डा परिसरातील पाझर तलाव आणि वन्यजीवांसाठी पाणीसाठ्याचा प्रश्न

साखरखेर्डा परिसरात पाझर तलावांचा पाणीसाठा धोक्यात! वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, उपसा मात्र सुरूच

Leave a comment