हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत अनधिकृत पाणी उपसा केल्यास पंप जप्त होणार; वीजपुरवठा खंडित करण्याचाही इशारा

On: October 9, 2026 1:37 PM
Follow Us:
चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची कारवाई

बुलढाणा | प्रतिनिधी

चिखली तालुक्यात पाण्याचा अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. पाणी उपसा करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितांचे पंप जप्त केले जाऊ शकतात. एवढेच नव्हे, तर दंड आकारणे, वीजपुरवठा खंडित करणे आणि आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाईही होऊ शकते. यंदा पर्जन्यमानात झालेली कमतरता आणि जलस्रोतांमधील अपुरा पाणीसाठा लक्षात घेऊन चिखली तहसील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी जलस्रोतांमधून होणाऱ्या अनधिकृत पाणी उपशावर तातडीने प्रतिबंध घालण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील जलाशय, नद्या, तलाव, कालवे आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये सध्या अपुरा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलस्रोतांचे संरक्षण करणे आवश्यक झाले आहे.

अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये मृद व जलसंधारण विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ही पथके तालुक्यातील विविध जलप्रकल्पांची नियमित तपासणी करण्यासोबतच अचानक पाहणीही करणार आहेत. तपासणीदरम्यान नियमबाह्य पाणी उपसा होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर लागू कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ तसेच केंद्रीय विद्युत कायदा, २००३ मधील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामध्ये पंप संच जप्त करणे, दंड आकारणे, वीजपुरवठा खंडित करणे आणि आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

विशेषतः आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी जलस्रोतांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा करू नये, असे आवाहन चिखलीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेले पाणी जपून वापरणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा!

चिखली, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा.

✅ WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

📢 तुमच्या परिसरात पाणीटंचाई, अनधिकृत पाणी उपसा किंवा नागरिकांशी संबंधित एखादी महत्त्वाची घटना घडली आहे का?

तुमच्या भागातील माहिती KattaNews पर्यंत पोहोचवा. स्थानिक प्रश्न आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्याशी संपर्क साधा.

कट्टा न्यूज — आपल्या भागातील बातम्या, आपल्या माणसांचा आवाज!

📰 हेही वाचा

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड; आई, भाऊ आणि पुतण्याची हत्या

जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची धारदार चाकूने हत्या; सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण चिखली तालुका हादरला

भानगुरा जिल्हा परिषद शाळेत महिला शिक्षिकेची मागणी

महिला शिक्षिकेची मागणी; भानगुरा शाळेत शिक्षकपदाचा प्रश्न ऐरणीवर, दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंद

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे पाटबंधारे विभागाचे आदेश

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा तात्काळ बंद; पाटबंधारे विभागाचा आदेश, पंप-मोटारी जप्त करण्याचा इशारा

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

Leave a comment