KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

‘दहा वेळा शून्य हा मोबाइल नंबर होऊ शकतो का?’ प्रश्न विचारला अन् शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप; जानेफळ पोलिसांत तक्रार

On: August 27, 2026 8:05 AM
Follow Us:
हिवरा खुर्द येथे विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप
जानेफळ |कट्टा न्यूज नेटवर्क 

KattaNews जाहिरात 1

हिवरा खुर्द येथील एका नामांकित विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. वर्गात मोबाइल क्रमांकाबाबत प्रश्न विचारल्यानंतर शिक्षक संतापले आणि विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या पाठीवर आणि कानामागे मारहाणीच्या खुणा व सूज असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणी जानेफळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

KattaNews जाहिरात 2

तक्रारीनुसार, शिक्षक राहुल जाधव वर्गात शिकवत असताना इयत्ता दहावीतील विद्यार्थी तन्मय समाधान खंडागळे याने मोबाइल क्रमांकाबाबत प्रश्न विचारला. ‘दहा वेळा शून्य हा मोबाइल नंबर होऊ शकतो का? मला फोन लावून दाखवा,’ असा प्रश्न विद्यार्थ्याने शिक्षकांना विचारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

KattaNews जाहिरात 3

विद्यार्थ्याने प्रश्न विचारल्यानंतर वर्गातील काही विद्यार्थी हसले. त्यानंतर शिक्षक संतापले आणि त्यांनी तन्मयला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या पाठीवर तसेच कानामागे दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

KattaNews जाहिरात 4

घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी या प्रकाराबाबत जानेफळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी केली जात असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डब्ल्यू. जारे यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “झालेल्या प्रकरणाची रीतसर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावरून नेमका वाद कसा झाला आणि त्यानंतर काय घडले, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. सध्या या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

📲 महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

स्थानिक तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.


👉 WhatsApp Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

🔗 संबंधित बातमी

महत्त्वाची नोंद : या वृत्तातील मारहाणीचे आरोप तक्रारीत नमूद केलेल्या माहितीनुसार आहेत. प्रकरणाची अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतर घटनेची अंतिम वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखली रुग्णालयात बिलावरून झालेला वाद आणि डॉक्टरांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचे प्रतिनिधिक दृश्य.

चिखलीत रुग्णालयात एक हजार रुपयांवरून वाद! डॉक्टर सुहास खेडेकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा; महिलेच्या विनयभंगाचा आरोप

डोणगाव परिसरात आशीर्वादाच्या बहाण्याने १० हजार १०० रुपये लंपास केल्याची घटना

भगवी पगडी, अंगाला भस्म अन् आशीर्वादाचा बहाणा! संभाजीनगरचा रस्ता विचारला, शुद्धीवर येताच खिशातील १०,१०० रुपये गायब!

प्रतापराव जाधव आणि सुबोध सावजी यांची वाढदिवसानिमित्त गळाभेट

बुलढाण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! प्रतापराव जाधव-सुबोध सावजींची गळाभेट; ‘दोन मल्ल एकत्र आले’ या विधानाची चर्चा

डोणगाव-जानेफळ मार्गावरील नवीन सिमेंट रस्त्यावर एसटी बससेवेची प्रतीक्षा

रस्ता झाला चकाचक, तरी ‘लालपरी’ गायब! डोणगाव-जानेफळ मार्गावर एसटी बस सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गिरोलीतील श्रीकृष्ण गोशाळेत पशुखाद्य व वैरणीचे वाटप

वाढदिवसाचा खर्च गोसेवेसाठी! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गिरोलीत स्तुत्य उपक्रम

साखरखेर्डा परिसरातील शिंदी येथे शेतातील केबल चोरी

साखरखेर्डा परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ! शिंदीतील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून केबल लंपास

Leave a comment