हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

Follow Us:
बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाणा : प्रा.दिलीप नाईकवाड

विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी विविध तारखांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ ऑगस्ट रोजी बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

२ ऑगस्ट रोजी अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर ३ ऑगस्ट रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये पुन्हा यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

४ ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ५ ऑगस्ट रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही भागातील शेतांमध्ये पाणी साचल्याने खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या जागेत थांबू नये, मोठ्या झाडाखाली आश्रय घेणे टाळावे, आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

📲 WhatsApp Group Join करा
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्या मिळवण्यासाठी kattanews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp Group Join Now

संबंधित बातम्या

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांनी निक्षय मित्र म्हणून टीबी रुग्ण दत्तक घेतल्यावेळी

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा मोठा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक

साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठ आणि श्री प्रल्हाद महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त उपस्थित भाविक

साखरखेर्ड्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात; श्री प्रल्हाद महाराज संस्थान व श्री पलसिद्ध महास्वामी मठात हजारो भाविकांची उपस्थिती

बुलढाणा येळगाव धरण 75 टक्के भरले

बुलढाणेकरांसाठी मोठा दिलासा! येळगाव धरण 75% भरले; पाणीटंचाई दूर होण्याची चिन्हे

Leave a Comment