हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

२९ जुलैला बुलढाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात जिल्हास्तरीय महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार

On: July 21, 2026 7:30 PM
Follow Us:
बुलढाण्यात २९ जुलै २०२६ रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आयोजित जिल्हास्तरीय महामोर्चा

बुलढाणा | विशाल गवई 

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र होत असताना बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, बुलढाणा जिल्हाच्या वतीने मंगळवार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात हजारो नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

महामोर्चाची सुरुवात जिजामाता प्रेक्षागृह, बुलढाणा येथून होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका संघर्ष समितीने मांडली आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे संरक्षण करावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या महामोर्चात सरसेनानी आनंदराज आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी खासदार जोगेंद्रनाथ कवाडे, आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार बाबनराव घोलप आणि आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह अनेक समाजप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

मोर्चा शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी, सामाजिक आणि पुरोगामी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असताना बुलढाण्यातील हा जिल्हास्तरीय महामोर्चा विदर्भातील महत्त्वाच्या आंदोलनांपैकी एक मानला जात आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे प्रशासनासह राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.


📲 KattaNews.in WhatsApp Channel

महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, कृषी अपडेट्स आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडी सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.


Related News

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे 23 जुलै 2026 रोजी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बंदची घोषणा

Buldana news : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ 23 जुलैला साखरखेर्डा बंद

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्राथमिक लाभार्थी यादीबाबत दिलेली महत्त्वाची माहिती

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक

बुलढाणा | धाड पेट्रोल पंप चोरीचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; आरोपी जेरबंद, ₹1.05 लाखांची संपूर्ण रक्कम जप्त

खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट बाहेर काढताना मजुराचा मृत्यू; अवैध वाळू उपशाचा संशय

जास्तीच्या मजुरीच्या आमिषाने गेला जीव! खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट काढताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात

Leave a Comment