हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा मधील क्रीडांगणावर अखेर शिक्कामोर्तब! ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर; युवकांनी फटाके फोडून केला जल्लोष

On: July 17, 2026 8:08 AM
Follow Us:
साखरखेर्डा ग्रामसभेत क्रीडांगणासाठी सरकारी जमीन राखीव ठेवण्याचा एकमुखी ठराव मंजूर

साखरखेर्डा | समाधान सरकटे

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावात गट क्रमांक ८७० मधील १ हेक्टर ६२ आर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याच्या मागणीला अखेर ग्रामसभेत एकमुखी मंजुरी मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या जमिनीच्या वापराबाबत सुरू असलेल्या वादाला ग्रामसभेच्या निर्णयाने मोठा पूर्णविराम मिळाला असून, निर्णय जाहीर होताच गावातील युवक, खेळाडू आणि नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

सदर जमीन शासनाच्या मालकीची असून अनेक वर्षांपासून गावातील युवक या ठिकाणी विविध क्रीडा प्रकारांचा सराव करत आहेत. काही दिवसांपूर्वी या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने नांगरणी करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर शेकडो युवकांनी आक्षेप नोंदवत क्रीडांगण कायम ठेवण्याची मागणी केली होती. परिस्थिती लक्षात घेऊन तहसीलदार अजित दिवटे आणि ठाणेदार युवराज रबडे यांनी मध्यस्थी करत संबंधित जागेवर ‘जैसे थे’ आदेश लागू केले आणि जागेचे सपाटीकरण करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित जमीन शासनाच्या नावे करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जमीन शासनाच्या नावे नोंद झाल्याची माहिती समोर आली. मात्र काही व्यक्तींनी संबंधित भूखंड हा साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीच्या मालकीचा असल्याचा दावा करत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. यामुळे या प्रश्नाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले होते.

१६ जुलै रोजी झालेल्या ग्रामसभेत गट क्रमांक ८७० मधील सरकारी जमीन मुलांच्या क्रीडांगणासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी कायम राखीव ठेवण्याचा ठराव मांडण्यात आला. ग्रामसभेत उपस्थित नागरिक, युवक आणि विविध मान्यवरांनी या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा दिला. चर्चेदरम्यान गोपाल राजपूत यांनी न्यायालयीन निकालानंतर जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवावी, मात्र नाव संस्थेचे असावे, असे मत व्यक्त केले. त्यावर अनेक नागरिकांनी हरकत घेत संबंधित जमीन सरकारच्या नावेच कायम ठेवून सार्वजनिक क्रीडांगण म्हणून राखीव ठेवण्याची मागणी केली.

ग्रामसभेला प्रशासकीय सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, माजी सरपंच पुनम महेंद्र पाटील, सुमनताई जगताप, कमलाकर गवई, दाऊद कुरेशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, उल्हास देशपांडे, सय्यद रफीक, शेख युनुस, इब्राहिम शहा, चंद्रशेखर शुक्ल, सुनील जगताप, माजी सभापती राजू ठोके, रामदाससिंग राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, दिलीप खंडारे, संग्रामसिंह राजपूत यांच्यासह शेकडो युवक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण देशमुख यांनी केले.

ग्रामसभा संपल्यानंतर साखरखेर्डा बसस्थानक परिसरात युवक आणि खेळाडूंनी फटाके फोडून आनंद साजरा केला. “जमीन नाही कोणा बापाची, ती आहे सरकारची” आणि “क्रीडांगण झालेच पाहिजे” अशा घोषणा देत त्यांनी ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले. विशेष म्हणजे या आनंदोत्सवात सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि खेळाडू एकत्र सहभागी झाले. गावातील भावी पिढीला दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सार्वजनिक जागा सुरक्षित राहावी, या भावनेतून ग्रामसभेने घेतलेला हा निर्णय साखरखेर्ड्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हे पण वाचा..

मोठी घोषणा! महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; शासनाने काढले नवे परिपत्रक

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात; विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते 3% कमिशन

एसटी स्थानकाच्या 200 मीटरमध्ये वाहन लावलं? थेट जप्ती; बुलढाण्यात RTO-पोलिसांची धडक कारवाई, 270 वाहनांवर Action

 

📢 KattaNews.in WhatsApp Group

महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, शासकीय योजना, शेती, शिक्षण, रोजगार आणि स्थानिक घडामोडींचे सर्वात जलद अपडेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बकरीच्या पैशांवरून वादानंतर वडिलांचा मृत्यू

म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव

अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली-खामगाव मार्गावर बस आणि टिप्परची जोरदार धडक

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

चिखलीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे निवेदन देताना उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर

चिखलीत मुलींच्या छेडछाडीविरोधात उपनगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा; “कारवाई करा, अन्यथा महिलांना घेऊन रस्त्यावर उतरू!”

MPSC पेपरफुटी प्रकरणात अवर सचिवासह 6 जणांना अटक

MPSC पेपरफुटीचा धक्कादायक भांडाफोड; अवर सचिवासह 6 जणांना अटक, प्रेमभंगातून फुटला पेपर

अंजनी खुर्द येथे ईद मिलाद निमित्त मदरशातील मुलांचा जुलूस

अंजनी खुर्दमध्ये ईद मिलादचा उत्साह; मदरशातील मुलांचा जुलूस अन् नात-कलिमाचे पठण

Leave a Comment