हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Breaking: अ-ब-क-ड उपवर्गीकरणावर बुलढाण्यातून मोठा विरोध; रिपाइंचे आमदारांना निवेदन देण्याचे आवाहन

On: April 26, 2026 7:34 AM
Follow Us:
अ-ब-क-ड उपवर्गीकरण विरोधात बुलढाण्यात रिपाइंचे आंदोलन

बुलढाणा | विशाल गवई 

राज्यातील अ-ब-क-ड उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावरून आता वातावरण तापू लागले असून आंबेडकरी समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आक्रमक झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया उमटली असून आमदारांना थेट निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरक्षण, सामाजिक न्याय आणि राजकीय घडामोडी यामुळे हा मुद्दा आता राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.

जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना आणि आंबेडकरी जनतेला स्पष्ट संदेश दिला आहे की, अनुसूचित जमातींच्या आरक्षणाच्या अ-ब-क-ड उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला ठाम विरोध नोंदवणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदारसंघातील आमदारांना भेटून लेखी निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे त्यांनी आवाहन केले आहे.

आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन मानले जाते. मात्र त्याचे तुकडीकरण केल्यास समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एकत्रित आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदारांना भेटून उपवर्गीकरणाविरोधात निवेदन देण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून संघटित पद्धतीने लोकशाही मार्गाने विरोध नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही केवळ एका समाजाची मागणी नसून समाजातील एकात्मता टिकवण्याची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण करण्याची लढाई असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. समाजाच्या सक्रीय सहभागातूनच हा प्रश्न प्रभावीपणे मांडता येईल, असे मत व्यक्त झाले आहे.

या आवाहनाला समाजभूषण प्रा. इंजि. भैयासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, महिला अध्यक्षा वंदनाताई वाघ, जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख नबाब मिर्झा, युवाजिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील (म्हस्के), विदर्भ महिला उपाध्यक्षा आशाताई वानखडे, विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे, रामेश्वर वाकोडे, भाऊसाहेब वानखडे, विदर्भ सचिव दलितमित्र विजयराज सपकाळ, जिल्हा संपर्क संघटक इंजि. शरद खरात, कार्याध्यक्ष प्रा. मुक्तार पठाण आणि सर्व तालुका अध्यक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.


👉 हे पण वाचा…


📢 हे आवश्यक करा..

👉 अशीच Breaking News, Maharashtra Political Updates आणि Exclusive Reports साठी लगेच Kattanews.in ला भेट द्या.

👉 ही बातमी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.

 

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२७ पाहताना महाराष्ट्रातील विद्यार्थी

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! पाहा, परीक्षा कधीपासून सुरू होणार

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

Leave a Comment