हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Big Crime: CCTV कट करून मेरा बुद्रुकमध्ये मध्यरात्री बिअर बार फोडला; लाखोंचा मद्यमाल लंपास

On: April 25, 2026 7:35 AM
Follow Us:
मेरा बुद्रुकमध्ये CCTV कट करून बिअर बार चोरी, लाखोंचा मद्यमाल लंपास

चिखली क्राईम न्यूज | सुनिल अंभोरे 

धक्कादायक आणि खळबळजनक चोरीच्या घटनेने मेरा बुद्रुक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी CCTV वायर कापून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बिअर बार फोडत लाखोंचा मद्यमाल व रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे सावट असून पोलिस तपासाला वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मेरा बुद्रुक फाटा ते गाव रस्त्यावर असलेल्या सोहम बिअर बार अँड रेस्टॉरंटवर ही धाडसी चोरी झाली. बार मालक निखिल पडघान यांनी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता बार बंद करून कुलूप लावले होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

मात्र मध्यरात्री २.३० ते ३.०० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप तोडले. एवढेच नाही तर बाहेर लावलेले CCTV कॅमेऱ्याचे वायर आणि लाईट वायरही कापून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सकाळी सुमारे ८ वाजता निखिल पडघान बारजवळ आले असता शटर अर्धवट उघडे असल्याचे दिसले. आत जाऊन पाहणी केली असता गोडाऊनमधील विदेशी दारूचे बॉक्स आणि बिअर शॉपीतील बिअरचे बॉक्स पूर्णपणे गायब असल्याचे आढळले. या चोरीत लाखोंचा मद्यमाल आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार भरत पोफळे पुढील तपास करत आहेत. परिसरातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा शोध सुरू आहे.

या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


👉 अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.


Related News:

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment