हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

करवंडमध्ये 370 वर्षांनंतर इतिहास जिवंत! शिवाजी महाराजांचा विवाह सोहळा, किल्ल्यासाठी मोठी घोषणा

On: April 17, 2026 7:45 AM
Follow Us:
करवंड येथे शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई विवाह सोहळ्याची भव्य पुनर्रचना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली बुलढाणा| कट्टा न्यूज नेटवर्क

आज करवंड गावात अक्षरशः इतिहास जिवंत झाला. 370 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या विवाह सोहळ्याची भव्य पुनर्रचना करण्यात आली. या सोहळ्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून, किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला 370 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने करवंड येथे प्रथमच ‘ऐतिहासिक करवंड महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि करवंड महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला.या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करताना सांगितले की, करवंड किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच येथील ऐतिहासिक बुरुजांचे जतन, राजवाड्याची डागडुजी आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे.इतिहासातील 15 एप्रिल 1657 रोजी झालेल्या या विवाह सोहळ्याचे स्मरण करताना, हा केवळ कौटुंबिक सोहळा नसून स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भूमीचे ऐतिहासिक महत्त्व जपत भविष्यात येथे भव्य स्मारक उभारण्याचाही निर्णय घेण्यात येणार आहे.

या महोत्सवात विधान परिषद आमदार धिरज लिंगाडे, विधानसभा आमदार श्वेता महाले, संजय गायकवाड, सिद्धार्थ खरात, मनोज यदे, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार श्वेता महाले यांनी सांगितले की, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा भव्य सोहळा साकार झाला. तसेच चिखली ते बुलढाणा दरम्यान वाढलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

या महोत्सवामुळे केवळ इतिहासाला उजाळा मिळाला नाही, तर करवंड परिसराच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.


👉 तुमच्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी Kattanews.in ला फॉलो करा

Kattanews.in वर रोज अपडेट राहा


Related News

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment