हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धोकादायक! येवती स्मशानभूमीत डोक्यावर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा; अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांचा जीव धोक्यात

On: April 2, 2026 9:14 AM
Follow Us:
येवती स्मशानभूमीत डोक्यावर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा

लोणार प्रतिनिधी| २ मार्च २०२६

लोणार तालुक्यातील येवती गावातील स्मशानभूमीत विजेच्या तारा धोकादायकरीत्या लोंबकळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने नागरिक येथे येत असताना या तारांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्मशानभूमी परिसरात योग्य अंतरावर विद्युत खांब नसल्यामुळे तारा खाली झुकलेल्या अवस्थेत आहेत. विशेषतः अंत्यविधीच्या वेळी मोठी गर्दी होत असल्याने एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी तारा अगदी डोक्याच्या उंचीपर्यंत खाली आल्याचेही दिसून येत आहे.

या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार महावितरणकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. “इतक्या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे, ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे,” असे स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, येवतीचे सरपंच रामेश्वर कायंदे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत तातडीने स्मशानभूमीत अतिरिक्त विद्युत खांब उभारून तारा योग्य उंचीवर नेण्याची मागणी केली आहे. “कोणताही अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाने या समस्येची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


👉 Related News


👉 हे आवश्यक करा  

अशाच ताज्या, स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जालना SRPF कॅम्पमध्ये गंभीर जखमी झालेला गुंज येथील जवान

जालना SRPF कॅम्पमध्ये मध्यरात्री खळबळ; बुलढाणा जिल्ह्यातील गुंजच्या 25 वर्षीय जवानाने स्वतःवर झाडली गोळी

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला धडक; अपघातात चालकाचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला जोरदार धडक; ३३ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

खामगावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

चारित्र्याच्या संशयाने संसार उद्ध्वस्त; ‘तुझे कोणासोबत लफडे आहे’ म्हणत पत्नीला बेदम मारहाण, अखेर मृत्यू

बकरीच्या पैशांवरून वादानंतर वडिलांचा मृत्यू

म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव

अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली-खामगाव मार्गावर बस आणि टिप्परची जोरदार धडक

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

Leave a Comment