रिसोड, वाशिम| २८ मार्च २०२६
रिसोड शहरात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेदरम्यान BLO चा कामचुकारपणा समोर आला असून त्यामुळे मतदार नोंदणी प्रक्रियेत गंभीर गोंधळ निर्माण झाला आहे. घरोघरी जाऊन माहिती संकलन करण्याऐवजी काही BLO फोनवरच प्रक्रिया करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक फैय्याज अहमद यांनी 27 मार्च रोजी मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, रिसोड नगर परिषदेत तहसीलदार यांच्या उपस्थितीत 24 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत BLO यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन नागरिकांना मदत करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, काही BLO यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करून कामचुकारपणा केल्याचा आरोप आहे.
विशेषतः यादी क्रमांक 287, 284, 302 आणि 306 या भागातील BLO आपल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून BLO ना सक्त सूचना द्याव्यात, जेणेकरून मतदार नोंदणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी प्रा. विजय तुरुकमाने, गजानन निखाते, साजिद खान, तारीक खान, युसुफ मन्सुरी, मोहम्मद जमील आदी उपस्थित होते.
👉 Related News
- उसने दिलेले पैसे मागितले आणि घडली भीषण घटना! महिलेवर बलात्कार करून हत्या; आरोपीला जन्मठेप
- धक्कादायक! SBI रिसोड शाखेत ग्राहकांची पिळवणूक? तासन्तास रांगेत, अधिकारी मात्र मोबाईलवर!
- मोठी बातमी! जनगणना २०२७ साठी विशेष प्रशिक्षण सुरू, मोबाईल अॅपद्वारे होणार माहिती संकलन
📢 तुमच्या परिसरातील बातम्या आम्हाला पाठवा – Kattanews.in वर प्रसिद्ध करा










