KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

On: March 17, 2026 7:59 AM
Follow Us:
Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर | १७ मार्च २०२६ 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर बायपास परिसरातील हॉटेल एकांत येथे सुरू असलेल्या कथित देहव्यापार प्रकरणावर मेहकर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीनुसार करण्यात आलेल्या या मेहकर पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून मुख्य आरोपीसह लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मेहकर शहरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’ या हॉटेल अँड लॉजिंगमध्ये महिलांकडून देहव्यापार करून आर्थिक फायदा घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या माहितीची खातरजमा करण्यात आली.पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसमक्ष त्या ठिकाणी धडक छापा टाकला. छाप्यादरम्यान प्रमोद धनसिंग पवार (रा. बिबी, ता. लोणार) हा संशयित व्यक्ती तेथे आढळून आला.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केल्यानंतर हॉटेलची झडती घेतली असता दोन महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी प्रमोद धनसिंग पवार तसेच ‘हॉटेल एकांत’च्या मालकाविरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात अप. क्र. १८३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणे, त्यातून आर्थिक लाभ मिळवणे तसेच महिलांना त्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.


Related News


हे आवश्यक करा…

आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि जलद बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. आपल्या मित्रांनाही ही बातमी शेअर करा आणि आमच्या WhatsApp व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन

सक्तीची कर्जवसुली थांबवा, स्मार्ट मीटर हटवा! मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनाला अल्टिमेटम

देऊळगाव राजा पोलीस आणि तेलंगणा LCB प्रकरण

मामाच्या तक्रारीवरून अपहरणाची नोंद करण्याची देऊळगाव राजा पोलिसांना घाई का? तेलंगणा LCB प्रकरणात सवाल

जुने मंडपगाव शिवारात अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले नऊ टिप्पर

देऊळगाव राजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल-पोलिसांची धडक कारवाई; एकाच वेळी ९ टिप्पर जप्त

इंस्टाग्रामवर प्रेम जुळल्याने साखरखेर्डा येथील संसार मोडल्याची घटना

इंस्टाग्रामवर प्रेम जुळले, १२ वर्षांचा संसार मोडला! चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन महिला ३० वर्षीय युवकासोबत निघून गेली

नेवासा सोयाबीन चोरी प्रकरणात देऊळगाव राजा येथील तिघांना अटक

नेवासा सोयाबीन चोरीचा तपास थेट देऊळगाव राजात; पाच जणांची नावे समोर, तिघांना अटक, दोघे फरार

देऊळगाव राजा येथे तेलंगणा पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेतल्याची घटना

देऊळगाव राजात तहसील कार्यालयातून सराफाला नेले; अपहरणाची चर्चा, नाकाबंदीत तेलंगणा पोलिसांचा मोठा खुलासा!

Leave a comment