रिसोड|वाशिम|५ मार्च २०२६
Washim Farmer Suicide: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील धोडप बु. येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष वामनराव बोडखे (वय अंदाजे ४६ वर्षे) यांनी ३ मार्च २०२६ रोजी गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती मिळाली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कर्जबाजारीपणा, शेतीतील सततचे नुकसान आणि आर्थिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष बोडखे हे अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून होते. गेल्या काही वर्षांपासून शेतीत सातत्याने नुकसान होत असल्याने ते आधीच आर्थिक संकटात सापडले होते. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतीवरील खर्च, बँकेचे वाढते कर्ज आणि घरखर्च यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला होता.
त्यातच मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना ते मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली. अखेर या तणावातून त्यांनी गळफास घेऊन(washim farmer suicide) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
संतोष बोडखे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा व इतर कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी संकट पुन्हा एकदा या घटनेमुळे चर्चेत आले असून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
📢 Kattanews.in वाचत रहा
अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि शेतकरी प्रश्नांवरील अपडेट्ससाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
🔎 Related News
- 632 शिक्षकांवर मोठी कारवाई! शालार्थ आयडी घोटाळ्यात नियुक्त्या अवैध; वेतन थांबवून पगार वसुलीचे आदेश कर्जबाजारीपणाचा प्रश्न
- अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेती, मदत शून्य; शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही विधवा पत्नीची तहसील कार्यालयात फरफट
- रिसोड-साखरा रस्त्याच्या खड्ड्यांविरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांचा इशारा














