दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

Buldhana Crime: १५ हजारांच्या लाचप्रकरणी अप्पर कोषागार अधिकारी रंगेहात अटक; तिघे ACB च्या जाळ्यात

On: March 3, 2026 8:44 AM
Follow Us:
ACB team arresting treasury officer in Buldhana 15 thousand bribe case

बुलडाणा | Buldhana Crime News: बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा कोषागार कार्यालयात कुटुंब निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अप्पर कोषागार अधिकारी आणि दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले. (Buldhana Crime  ACB Action) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस विभागातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे २०२५ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नीला कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव जिल्हा कोषागार कार्यालयात दाखल करण्यात आला होता. मात्र कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वारंवार त्रुटी काढून फाईल अडवण्यात येत असल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा येथे तक्रार नोंदवली. एसीबीने २६ फेब्रुवारी रोजी मागणीची पडताळणी केली असता १५ हजार रुपयांची लाच घेण्याचे निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला.

या कारवाईत अप्पर कोषागार अधिकारी प्रविण गोविंदराव मोंढे (४५), कनिष्ठ लेखापाल विनोद अंबादास घट्टे (४३) आणि लेखा लिपिक जीवन पांडुरंग काळे (३४) यांना तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे जिल्हा कोषागार कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली.

या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात एसीबीची ही धडक कारवाई नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


👉 Related News


📢 Kattanews.in वर अशाच ताज्या Buldhana Crime, Maharashtra Breaking News आणि ACB Action संदर्भातील अपडेट्ससाठी नियमित भेट द्या. बातमी शेअर करा आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात सहभागी व्हा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

साखरखेर्ड्यात भरदिवसा महिलेच्या घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न; आरडाओरड ऐकून नागरिकांनी आरोपीला पकडले

साखरखेर्डा तालुका मागणीवर बोलताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगण

‘शासनाचं आवतन म्हणजे जेवण वाढल्याशिवाय खरं नाही’; साखरखेर्डा तालुका मागणीवर डॉ. राजेंद्र शिंगणे स्पष्टच बोलले

Leave a comment