हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

गोरेगावात ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर 2026’ उत्साहात; रेशन कार्ड ते वारस नोंदींचे थेट वितरण

On: February 14, 2026 12:14 PM
Follow Us:
गोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर 2026 दरम्यान रेशन कार्ड व वारस नोंदींचे वितरण

साखरखेर्डा / सिंदखेड राजा |१४ फेब्रुवारी २०२६

गोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर 2026 मोठ्या उत्साहात पार पडले असून नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ मिळाला. सिंदखेड राजा राजस्व मंडळ अंतर्गत आयोजित या शिबिरात रेशन कार्ड वितरण, वारस नोंदी, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले तसेच निराधार अनुदानाशी संबंधित कामे जागेवरच पूर्ण करण्यात आली.

माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी हे शिबिर पार पडले. अध्यक्षस्थानी एस. एस. साळवे (मंडळ अधिकारी, शेंदुर्जन) होते.

प्रमुख उपस्थितीत वसुदेव उत्तमराव पांचाळ (सेवानिवृत्त शिक्षक), बाबुरावजी मोरे (माजी समाज कल्याण सभापती), मोहन गायकी (माजी सरपंच उमनगाव), खुशालराव पंचाळ (उपसरपंच), जयदीप पांचाळ (सामाजिक कार्यकर्ते), रतन तुपकर (स्वस्त धान्य दुकानदार) तसेच ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका आणि महसूल मंडळ अधिकारी आनंद राजपूत, ग्राम महसूल अधिकारी शिवानंद वाकतकर, दांडगे, विशाल अवचार यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानामुळे दीर्घकाळ प्रलंबित महसूल व सामाजिक योजनांची कामे मार्गी लागली. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना तालुका कार्यालयाच्या चकरा माराव्या लागल्या नाहीत. गावातच प्रमाणपत्रे व शासकीय लाभ मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी सचिन पांचाळ व संदीप पांचाळ यांनी विशेष सहकार्य केले.

📌 Related News

📢 Kattanews.in वर वाचा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

स्थानिक, राजकीय, महसूल, गुन्हेगारी आणि सामाजिक घडामोडींच्या अपडेटसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम

देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिखली तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100 घेतल्याची तक्रार

चिखलीत रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100? तहसील कार्यालयातील तक्रारीने खळबळ; चौकशीची मागणी

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील SIR मतदार पडताळणी अभियान

Sindkhed Raja News: 3 लाख 11 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण; मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांचा आकडा समोर

चिखली तहसील कार्यालयासमोर निकृष्ट रेशनचा तांदूळ ओतताना नागरिक

“या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका-पोरांसोबत खावी!” चिखलीत संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरच ओतला रेशनचा तांदूळ

साखरखेर्डा येथे कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करण्याचे पोलिसांचे आवाहन

कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करा; साखरखेर्डा येथे पोलीस अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

Buldhana News जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय

Buldhana News: बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत ‘सहकार’चा चौकार! ७ पैकी ५ जागा जिंकल्या; डॉ. राजेंद्र शिंगणे ठरले किंगमेकर?

Leave a Comment